*बामखेडा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न*
*बामखेडा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती तर्फे “परंपरागत भारतीय ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांच्या एकत्रीकरणातून शाश्वत पर्यावरणीय भविष्यासाठी 2025” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. द्बितीय सत्रात पद्मश्री चैत्राम पवार यांनी जल जंगल व जमीन यांची जोपासना हीच भावी पिढ्यांची संपत्ती असल्याचे प्रतिपादन केले. क. ब.चौ.उ.म.वि जळगांव येथील केसीआयआयएल चे सीईओ डाॅ नयन खंदारे यांनी स्टार्टअप व पेटंट या विषयी मार्गदर्शन केले. प्रकाश पाटील यांनी जलसंवर्धनाची पध्दत व गरज या विषयी मार्गदर्शन केले. गणेश भुते यांनी चंद्रपुरच्या गाव विकासाची यशोगाथा मांडली.
या प्रसंगी जयंत उत्तरवार, बी जी महाजन, कांतीलाल पाटील, गणेश पाटील आदि उपस्थित होते. या प्रसंगी विविध स्टाॅंल विक्री व प्रदर्शनीसाठी लावले होते यात मशरुम, सेंद्रीय धान्य, खते, तांदुळ, आगाखान फांऊंडेशनचे उपक्रम, तसेच मेघालयातील कराई सोह ह्या ज्वारीच्या वाणाची यशस्वी लागवडीचा स्टाॅंल कोमलसिंह गिरासे यांनी लावला होता.
परिषदेची सुरुवात साधक डाॅ अलरिचबर्क (जर्मर्नी) यांनी अग्नीहोत्र यज्ञाने झाली तर सांगता शेतकरी असलेल्या परंतु अनुभवांच्या शाळेत पारंगत असलेल्या पं.कृ. विद्यापीठ, अकोला च्या सेंद्रीय शेतीतज्ञ सल्लागार असलेल्या अण्णा हांडे (नाशिक) गीते वरील शाश्वततेच्या भाष्याने झाली. भारताच्या पारंपारिक ज्ञानाची आणि अधुनिकतेशी सांगड अश्या पध्दतीने घालण्याचा हा महाविद्यालय स्तरावर अनोखा व पहिलाच प्रयत्न असल्याचे गौरवोद्गगार जिल्हाधिकारी डाॅ मित्ताली सेठी यांनी या प्रसंगी काढले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष दादासाहेब पी बी पटेल व सचिव अप्पासाहेब बी व्ही चौधरी यांना पन्नासहुन अधिक वर्षाच्या शैक्षणिक सेवे बद्दल, व गुणवत्तापुर्ण शिक्षणाचा परिपाठ निर्माण केल्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजकांतर्फे वतीने कार्यगौरव सन्मान पत्र देण्यात आले. युनोचे माजी सल्लागार सागरा धारा, माजी प्राचार्य डाॅ मोहन परजने, जलनायक प्रकाश पाटील व प्राचार्य डाॅ एच एम पाटील या समितीने हे सन्मान पत्र मान्यवरांना प्रदान केले.
कार्यक्रमास महेश्वर, इंदोर, मुलतई (एम पी), सुरत, तेलंगणा, तसेच महाराष्ट्रातील बीड, परभणी, उस्मानाबाद, संभाजीनगर, नागपुर, नाशिक, जळगांव, धुळे, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, सांगली सातारा, पुणे, अहिल्यानगर आदि परिसरातील शेतकरी, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग, बचत गटांचे प्रतिनिधी तसेच पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेला कृषी मंत्री दत्ता मामा भरणे तसेच
पद्मविभुषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, इंदौर येथील पद्मश्री जनक पलटा माजी प्र कुलगुरु पी पी माहुलीकर याचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी परिषदेची भूमिका, उद्दिष्टे व अपेक्षित दिशा स्पष्ट केली.



