*कृषीदूतांचे भोरटीपाडा येथे आगमन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषीदूतांचे भोरटीपाडा येथे आगमन*
*कृषीदूतांचे भोरटीपाडा येथे आगमन*
साक्री(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील शासकीय कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अर्थात कृषीदुतांचे साक्री तालुक्यातील भोरटीपाडा गावात 12 डिसेंबर 2025 रोजी आगमन झाले. ग्रामपंचायतीतर्फे कृषीदुतांचे स्वागत करण्यात आले. स्वागता वेळी सरपंच सौ. रंजना साबळे ग्रामसेवक श्रीमती एस. टी. राठोड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कृषीदूतांमध्ये खुशाल गायकवाड, राजवर्धन खैरनार, प्रतिक कुळमेथे, पृथ्वीक पाडवी आणि निरज शेळकंदे यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमांतर्गत कृषीदूत गावातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, मृदा आरोग्य, कीड व रोग नियंत्रण आणि इतर कृषी संबंधित बाबींवर मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच कृषी उद्योगांशी संलग्न राहून त्यांना व्यवहारिक अनुभव देखील मिळणार आहे. या उपक्रमासाठी शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. बी. होले, रावे चेअरमन प्रो. एस. डी. पाटोळे, प्रोग्राम ऑफिसर डॉ. व्ही. के. बलसाने, रावे को-ऑर्डिनेटर डॉ. डी. बी. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.



