*‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देशभरात अन्नधान्य उचलण्याची सुविधा-कैलास पवार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देशभरात अन्नधान्य उचलण्याची सुविधा-कैलास पवार*
*‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत, जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देशभरात अन्नधान्य उचलण्याची सुविधा-कैलास पवार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या “एक देश एक रेशन कार्ड” (One Nation One Ration Card - ONORC) या महात्वाकांक्षी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना आता देशभरातील कोणत्याही राज्यात किंवा जिल्ह्यातील ई-पॉइंट ऑफ सेल (e-POS) यंत्रणायुक्त रास्त भाव दुकानातून आपले अन्नधान्य उचलण्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. योजनेचा उद्देश आणि फायदे,
या योजनेचा मुख्य उद्देश स्थलांतरित मजूर, कामगार, विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणे हा आहे. कामासाठी किंवा इतर कारणांसाठी स्थलांतर करणाऱ्या व्यक्तींना आता त्यांच्या मूळ शिधापत्रिकेच्या आधारे नवीन ठिकाणीही अन्नधान्य मिळू शकणार आहे.
आधार प्रमाणीकरण (e-KYC) आवश्यक, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी शिधा उचलताना आधार प्रमाणीकरण (e-KYC) करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (NFSA) लाभार्थ्यांना त्यांच्या शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार संलग्नीकरण (Aadhaar seeding) आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे, जेणेकरून कोणत्याही अडचणीशिवाय योजनेचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा, योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधित रास्तभाव दुकानदार, तहसील कार्यालय किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



