*स्व.बटेसिंग रघुवंशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्व.बटेसिंग रघुवंशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन*
*स्व.बटेसिंग रघुवंशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समितीचे माजी चेअरमन तथा माजी आमदार स्वर्गीय बटेसिंग रघुवंशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जी. टी. पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील त्यांच्या समाधीस्थळी विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी यांच्या हस्ते पुष्पअर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी, संचालक किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, माजी जि. प. अध्यक्ष वकील पाटील, माजी नगरसेवक दीपक दिघे, रवी पवार, कुणाल वसावे व निंबा माळी उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी, प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी, प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, उपप्राचार्य संदीप पाटील यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे संयोजन जयंती उत्सव समितीने केले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. बटेसिंग रघुवंशी यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याचा गौरव करून त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.



