*53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुमन विद्यालय, टेरवचे नेत्रदीपक यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुमन विद्यालय, टेरवचे नेत्रदीपक यश*
*53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुमन विद्यालय, टेरवचे नेत्रदीपक यश*
चिपळूण(प्रतिनिधी):-तालुकास्तरीय 53 वे विज्ञान प्रदर्शन माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती चिपळूण आणि श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट डेरवण - सावर्डे, संचलित डेरवण इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10, 11 व 12 डिसेंबर 2025 रोजी डेरवण इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात सुमन विद्यालय, टेरव या प्रशालेने उच्च प्राथमिक तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. उच्च प्राथमिक गटात (इयत्ता 6 वी ते 8 वी) सुमन विद्यालय, टेरवच्या कुमारी विभावरी संतोष वास्कर (इयत्ता 8 वी) व कुमार हर्ष विजय गावडे (इयत्ता 8 वी) यांनी सादर केलेल्या “वृद्धांचा सोबती” या विज्ञान उपकरणाला चिपळूण तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात (इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी) कुमारी तन्वी प्रदीप सागवेकर (इयत्ता 10 वी) व कुमार प्रथमेश मनोहर मांडके (इयत्ता 9 वी) यांनी सादर केलेल्या “मल्टीपर्पज वायरलेस अलर्ट सिस्टीम” या उपकरणालाही प्रथम क्रमांक मिळाला. या दोन्ही विज्ञान उपकरणांची पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. 12 डिसेंबर 2025 रोजी आयोजित दिमाखदार पारितोषिक वितरण समारंभात विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट डेरवण- सावर्डेचे संचालक व एस.व्ही. जे.सी.टी. प्रशालेचे शाळा समिती अध्यक्ष विकास वालावलकर आणि पंचायत समिती चिपळूणचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी इरनाक यांच्या शुभहस्ते तसेच शिक्षण विस्तार अधिकारी राज अहमद देसाई, श्रीमती अस्मा कौसर देसाई, श्रीमती सशाली मोहिते, डॉ. डोनाल, केंद्रप्रमुख श्रीमती गावडे, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शैलेश सुर्वे, गणित मंडळाचे अध्यक्ष बिराप्पा मोटगी, आशुतोष गांधी, परीक्षण समिती प्रमुख राजेश इंगळे, सय्यद, शेले तसेच शिक्षण विभागातील अधिकारी, तालुका विज्ञान-गणित मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक व बालवैज्ञानिक यांच्या उपस्थितीत सुमन विद्यालय, टेरवचा विशेष सन्मान करण्यात आला. सदर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे विज्ञान शिक्षक अमोल टाकळे तसेच मुख्याध्यापक मंदार सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले. डेरवण येथे आयोजित 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दोन्ही गटांत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या यशवंत विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विकास कदम, सचिव योगेश कदम, खजिनदार अजित कदम तसेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद, पालक, ग्रामस्थ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.



