*रघुवंशी नर्सिंग कॉलेज, नंदुरबार येथे सतत नर्सिंग शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रघुवंशी नर्सिंग कॉलेज, नंदुरबार येथे सतत नर्सिंग शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन*
*रघुवंशी नर्सिंग कॉलेज,नंदुरबार येथे सतत नर्सिंग शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्रीमती.विमलताई बटेसिंग रघुवंशी कॉलेज ऑफ नर्सिंग, नंदुरबार येथे “रुग्ण-केंद्रित सेवेमध्ये समग्र (HolisticApproach in Patient care) दृष्टिकोन” या विषयावर 18 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील प्रथम नर्सिंग शिक्षण (CNE) कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
CNE कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतील नामवंत तज्ज्ञ व ज्येष्ठ नर्सिंग व्यावसायिकांनी एकूण सहा शैक्षणिक सत्रे घेतली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली, त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार यांच्या नर्सिंग अधीक्षिका निलिमा वळवी (मुख्य अतिथी), डॉ. एन. डी. चौधरी, प्राचार्य, एनटीव्हीएस लॉ कॉलेज (विशेष आमंत्रित), एम. एस. रघुवंशी, एनटीव्हीएस समन्वयक, डॉ. पुषेंद्र, प्राचार्य, शासकीय नर्सिंग महाविद्यालय, जळगाव, तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे CNE निरीक्षक सुशील नाईक उपस्थित होते. या शैक्षणिक सत्रांमध्ये डॉ. पुषेंद्र निखुंभ, डॉ. ज्योती ठाकूर, डॉ. सरोज उपासनी, डॉ. विजया गांगोडे, डॉ. टी. शिवबालन आणि डॉ. महादेव गायकवाड यांनी समग्र नर्सिंग सेवांचे विविध पैलू व रुग्ण- केंद्रित सेवेतील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात 250 नोंदणीकृत परिचारिका सहभागी झाल्या होत्या. स्वागतपर भाषणात कार्यवाह प्राचार्य भुषण ठोंबरे यांनी उपस्थित मान्यवरांची ओळख करून देत परिचारिका या आरोग्यसेवा व्यवस्थेचा कणा असून दर्जेदार रुग्णसेवेसाठी त्यांचे सातत्याने कौशल्यवर्धन आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल व नंदुरबार तालुका विद्यायक समिती, अध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी व उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील पहिल्या CNE कार्यक्रमास परवानगी व सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. सर्व सहभागी परिचारिकांनी सत्रांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सहभागींच्या अभिप्रायानुसार हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध व उपयुक्त ठरला असून त्यामुळे नर्सिंग कार्यपद्धतीत व दर्जेदार रुग्णसेवेत सुधारणा होण्यास मदत होईल. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समितीतील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. श्रीमती योगिनी सपकाळे व कु. अंजली तडवी यांनी सूत्रसंचालन केले, तर आभारप्रदर्शन भुषण वळवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीपणे करण्यासाठी शिक्षक मधुर वळवी, भूषण वळवी, अंजली tadvi, सोनल गावीत, शंकर वसले, वंदना वळवी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय गीत “वंदे मातरम्” ने करण्यात आला.



