*नंदुरबार येथे जागतिक दिव्यांग दिवस पंधरवडा साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे जागतिक दिव्यांग दिवस पंधरवडा साजरा*
*नंदुरबार येथे जागतिक दिव्यांग दिवस पंधरवडा साजरा*
नंदूरबार(प्रतिनिधी):-17 डिसेंबर 2025 ला नंदुरबार येथे शिवाजी नाट्यगृहाच्या शेजारीचा हाॅलमध्ये जागतिक दिव्यांग दिवस पंधरवडा अतिशय उत्साहात व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांच्या व भगीनीच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला, या कार्यक्रमासाठी नंदुरबार सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पालक आधीकारी नंदकिशोर सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी विशाल भगत, नंदुरबार आगर व्यवस्थापक संदिप निकम, जिल्हा उद्योग केंद्र इन्स्ट्रक्टर एम.पी. पाटील, व आधार केंद्रप्रमुख जयेश खैरनार आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रस्ताविक राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे यानी केले, तसेच जिल्हाध्यक्ष राजा कुवर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते. 17 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस पंधरवडा कार्यक्रम शिवाजी नाट्यगृहात राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ, जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला, या कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रकांत पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारींनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आम्ही शासनस्तरावर शासकीय आदेशप्रमाणे तातडीने कार्यवाही सुरू केली आहे, हि आमची जबाबदारी संपूर्णपणे व्यावस्थीत पार पाडण्यासाठी तत्परतेने कारवाई करीत आहोत, तसेच शिवाजी मोरेंनी बऱ्याच मुद्दावर प्रकाश टाकल्याने त्यामुळे आम्ही त्यांचे निश्चितच सकारात्मक प्रतिसाद देत समाधान केले जाईल, व ग्रामीण भागातील दिव्यांगांच्या संख्येची नोंदणी सुरू झालेली आहे.
अंजली शर्मा प्रांताधिकारी सहायक जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, आम्ही सर्व एक आहोत वयस्कर झालेवर व्यक्तीही दिव्यांगच होतो, म्हणून आम्ही आपल्या भावनांचा आदर करत न्याय दिला जाईल, आपली कोणतीही अडचण असेल तर मला कधीही भेटू शकता. नंदकिशोर सुर्यवंशी दिव्यांग सक्षमीकरण पालक अधि., तथा समाज कल्याण अधिकारी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की मी माझ्या दिव्यांग बांधवांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करुन त्यांच्या जिल्हास्तरीय विविध प्रकारच्या समस्यांचे निराकरण करणे ही माझी जबाबदारी असल्याने मी त्यांना हतबल होऊ देणार नाही, बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यासाठी दिव्यांग बांधवांनी महासंघाच्या माध्यमातून सहक्रीय रहावे असेही आवाहन केले, मी गुगलवर दिव्यांगांची नोंदणीसाठी फाॅर्म अपलोड केला आहे, तो आपण आपल्या मोबाईल वरुन भरायचा आहे, जेणेकरून आपल्याला विविध प्रकारच्या योजनांचे लाभ देणे सोपे होईल म्हणून जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी ते फाॅर्म त्वरीत भरावेत, माझ्याकडे आपल्यासाठी पालक अधिकारी म्हणून जबाबदारी आहे ती मी संपुर्णपणे पार पाडत आहे, व आपल्यासाठी जिल्हा परिषदेतून 1 टक्के निधी वेगळा करुन त्याचे खर्चाचे नियोजन केले आहे व 5 टक्के निधी साहित्य वाटपासाठी वेगळी तरतूद केली आहे, आपणास कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा अडचण असल्यास जिल्हा परिषदत सुट्टीचे दिवस सोडून 10-30 ते 5-30 या दरम्यान कधीही भेटू शकता. व आपले प्रश्न उपस्थित करणे व सोडून घेणेसाठी शिवाजीराव मोरे यांची जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी जिल्हा दिव्यांग शासकीय समितीवर निवड केली असल्याचे सांगितले. व आता या पुढे आँनलाईन अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तिन दिवस जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ठरऊन दिले आहेत, तसेच सोयीचे झाले पाहिजे म्हणून नवापूर व तळोदा तालुका ग्रामीण रुग्णालयातही एक दिवस आँनलाईन प्रमाणपत्र देण्याची सोय केली असल्याचे सांगितले.
व एम.पी पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे इंस्ट्रक्टर यांनी दिव्यांग बांधवांसाठी विविध कर्ज योजनांचे प्रस्ताव सादर करावे, ते आम्ही बँक अधिकाऱ्यांशी बोलून कर्जे उपलब्ध करून देण्यात सहकार्य करण्याचे सांगितले. व संदिप निकम जिल्हा आगार प्रमुख यांनी बोगस दिव्यांग मोठ्या प्रमाणावर दिसून येता आहेत व बस प्रवासाचा लाभ घेता आहेत, व ज्याच्याकडे UDID कार्ड असेल त्यांनाच लाभ देत आलोत, आपणास बोगस दिव्यांग असल्याचे लक्षात आल्यावर अशांची तक्रार आमच्याकडे द्याव्यात आम्हीही कायदेशीर कारवाई करण्यास तयार आहोत. तसेच शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आमचा राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ महाराष्ट्रातील एकमेव अराजकीय संघटन असुन सन 2000 पासून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पदरमोड करत सतत कार्यरत आहोत, आम्ही दिव्यांगांना न्याय, हक्क मिळवून दिले आहेत व त्यासाठी मुंबई हायकोर्टातही जावे लागले तेव्हा कृती आराखडा तयार झाला, म्हणून काही प्रमाणात योजनांचे लाभ मिळू लागले आहेत, व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी व लढा उभा करणारी एकमेव संघटना असल्याचे सांगितले.
तसेच बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, कारण काय ? ही कारवाई इतर जिल्ह्यांमध्ये तातडीने केली जाते आहे, 5 टक्के निधी नियमानुसार वाटप होत नाही, दिव्यांग लोकांची संख्या किती आहे ? या संबंधीचे रजिस्टर नोंदणी केली जात नाही हे, म्हणून अशा अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जावी, अंत्योदय योजनेचे लाभ देणेसाठी आम्हाला तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागता आहेत, आमदार खासदार यांच्या निधीतून 30 लाख रुपये दिव्यांगासाठी दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असतांना हे का केले जात नाहीत, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी रिपोर्ट जमा केल्यानंतर टोकन पावती दिली जात नाही, म्हणून दिव्यांगांना 6-6 महिन्यांपावेतो आँनलाईन अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळत नाहीत, व बँक अधिकारी व्यावसायिक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत करतात, व अरेरावीची भाषेचा वापर करतात असे अनेक मुद्दे या निमित्ताने उपस्थित केलेत, आणि या विषयावर शासकीय स्तरावर अधिकरी दिरंगाई व उदाशिन असल्याची खंत व्यक्त केली आहे, पण या कामी जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांचे चांगले सहकार्य मिळत असल्याने दिव्यांग महासंघाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले असल्याचे सांगितले.
तसेच या विशेष दिनाच्या निमित्ताने चार दिव्यांग बांधवांनी व भगीनींनी विशेष प्राविण्य प्राप्त केल्यामुळे संन्मान सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास गणेश मोरे उपमुख्य कार्यकारी सा.प्र. विभाग, विशाल भगत जिल्हा पुरवठा अधिकारी, व मा. जयेश खैरनार आधार केंद्र प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते व महासंघाच्या जिल्हा व तालुका असे 50 पदाधिकाऱ्यांची टिम उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजाभाऊ कुवर जिल्हा अध्यक्ष, मंगेश वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष अधिकारी कर्मचारी संघ, अरविंद शिंदे जिल्हा उपसरचिटणीस, व वकिल पाटील नंदुरबार तालुका अध्यक्ष यांनी परिश्रम घेतले. व अतीशय सुंदर व अलंकारीक भाषेत सुत्रसंचलन शंकर निकाळजे यांनी केले. व प्रमुख अतिथींचे व दिव्यांग बांधवांचे व भगीनींचे आभार प्रदर्शन मंगेश वाघमारे यांनी मानले.



