*एकलव्य विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन*
*एकलव्य विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे 17 डिसेंबर 2025, बुधवार रोजी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये विविध वैज्ञानिक संकल्पनांचे उपयोजन व समस्या निराकरणाचे गुण वृद्धिंगत करणे हे विज्ञान प्रदर्शनाचे उद्दिष्ट असते. आयोजित विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक गटातून एकुण 85 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुनील केशव चौधरी यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले तसेच विद्यार्थ्यांच्या उपकरणांची पाहणी देखील केली. विद्यालयातील विज्ञान शिक्षक मिलिंद वडनगरे, योगेश पाटील, किरण रघुवंशी व जयश्री खैरनार यांनी प्रदर्शनाचे परीक्षण केले. विज्ञान प्रदर्शन प्रसंगी सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपकरण सादर केले यात घरातील लहान समस्यांपासून ते पर्यावरण प्रदूषण, शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन यासारख्या विविध विषयांचा समावेश होता.



