*जी टी पाटील महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी टी पाटील महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात साजरा*
*जी टी पाटील महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी टी पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात 18 डिसेंबर जागतिक अल्पसंख्यांक हक्क दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ एम जे रघुवंशी होते. तर प्रमुख पाहुणे हिंदी अभ्यासक्रम मंडळ अध्यक्ष उमवी जळगाव डॉ संजय शर्मा होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक हक्क दिवसा निमित्ताने मार्गदर्शन करतांना सांगितले की, आपल्या देशात अनेकता मे एकता है गैरसमज निर्माण झाल्यामुळे अखंडतेला धोका निर्माण होतो याची अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केलं. तसेच घटनेने सर्वांना अधिकार दिलेले आहेत. अल्पसंख्यांकांचे अधिकारही अबाधित राहावे त्यांचाही विकास व्हावा यासाठी अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा केला जातो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एम जे रघुवंशी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, भारताच्या पुढाकाराने 18 डिसेंबर हा जागतिक अल्पसंख्याक दिवस साजरा केला जातो. भारतात अनेकतेत एकता आहे बहुसंख्याकांमध्ये अल्पसंख्याक धर्म असो की भाषा मागे राहू नये अल्पसंख्यांकाचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास व्हावा त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी घटनात्मक अधिकार देण्यात आले आहेत. देशाच्या विकासासाठी सर्व घटकांचा विकास होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले तत्पूर्वी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले नंतर प्रातिनिधिक स्वरूपात अल्पसंख्याक विद्यार्थी व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एस पी पाटील. प्रा अंकुश रघुवंशी, डॉ मनोज शेवाळे, प्रा के बी दवे, प्रा अबूजर पठाण प्रा तुषार वाघ उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ वसीम मकरानी, सूत्रसंचलन डॉ समीरा अहमद यांनी तर आभार प्रकटन प्रा मोईन शेख यांनी मांडले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



