*प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाला, आदिवासी क्रांतिवीर तंट्या मामा भील किंवा ख्वाजा नाईक यांचे नाव देण्याची भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
*प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाला, आदिवासी क्रांतिवीर तंट्या मामा भील किंवा ख्वाजा नाईक यांचे नाव देण्याची भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे मागणी*
*प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाला, आदिवासी क्रांतिवीर तंट्या मामा भील किंवा ख्वाजा नाईक यांचे नाव देण्याची भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे मागणी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदी पुलाला आदिवासी क्रांतिवीर तंट्या मामा भील किंवा ख्वाजा नाईक यांचे नाव देण्याची मागणी भारत आदिवासी सविधान सेने तर्फे उपविभागीय प्रांताधिकारी शहादा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले असून, शहादा प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाला आदिवासी क्रांतिवीर तंट्या मामा भिल किंवा ख्वाजा नाईक यांचे नाव देण्याची मागणी भारतीय आदिवासी संविधान सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन केली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील प्रकाशा हे शहर महाराष्ट्रात खान्देशची काशी म्हणून महाराष्ट्रत प्रसिद्ध आहे, आणि संपूर्ण परिसर हा आदिवासी बहुल्य क्षेत्र येत असल्यामुळे, कोळदा ते खेडदिगर दरम्यानच्या रस्त्यात येणाऱ्या प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाला आदिवासी क्रांतिवीर तंट्या मामा भिल किंवा ख्वाजा नाईक यांचे नाव द्यावे अशी मागणी शहादा उपविभागीय प्रांत अधिकारी कृष्णकांत कणवरिया यांना निवेदन देऊन केली आहे, निवेदनावर भारतीय आदिवासी संविधान सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, शहादा तालुकाध्यक्ष किरण ठाकरे, योगेश पवार, राहुल उखळदे, सुनील भिल रोहित पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.