*नागरिकांची फसवणूक करुन सिमकार्ड Activate (कार्यान्वीत) करणारे 4 सिमकार्ड विक्रेते सायबर सेल पोलीसांच्या ताब्यात
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नागरिकांची फसवणूक करुन सिमकार्ड Activate (कार्यान्वीत) करणारे 4 सिमकार्ड विक्रेते सायबर सेल पोलीसांच्या ताब्यात
*नागरिकांची फसवणूक करुन सिमकार्ड Activate (कार्यान्वीत) करणारे 4 सिमकार्ड विक्रेते सायबर सेल पोलीसांच्या ताब्यात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील 2 इसम व धानोरा येथील 3 इसमांनी विक्री केलेले Vodafone, Idea, Airtel व इतर कंपनीच्या सिमकार्डचा उपयोग विदेशातून पोलीस असल्याचे भासवून नागरिकांना कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देवुन त्यांची फसवणुक करणे, असे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DOT) यांच्याकडुन मिळालेल्या माहिती वरुन निष्पन्न झाले. त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षीक श्रवण दत्त. एस यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना सदरची माहिती कळवून नंदुरबार व धानोरा येथील सिमकार्ड विक्री करणाऱ्या संशयीत इसमांबाबत माहिती घेवून पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांचे एक संयुक्त पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या माहितीमधील संशयीत इसमांना ताब्यात घेणेबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे पथकांनी अनिल गुरुनामल दहेडा वय 40 रा. सिंधी कॉलनी नंदुरबार, निकेश जयसिंग वळवी वय-25 वर्ष, हितेश जगन वळवी वय 24 वर्ष, रोहित गणेश नाईक वय 20 वर्ष, सर्व रा. नटावद ता. जि. नंदुरबार यांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता अनिल दहेडा यांचे सांगण्यावरुन सदर तिन्ही आरोपीतांनी नंदुरबार जिल्हयातील लोकांचे ओळखपत्रांचा वापर करुन त्यांच्या नावाने Vodafone, Idea, Airtel कंपनीचे एकुण 472 सिमकार्ड Activate केले. तसेच वेगवेगळया लोकांचे बैंक खाते उघडुन पासबुक/ATM कार्ड कागदपत्रं उल्हासनगर येथील संशयीतास पाठविले होते व त्या सिमकार्डचा उपयोग विदेशातून (UAE) TRAI, DOT, पोलीस असल्याचे भासवून, कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देणे अशा स्वरुपाच्या फसव्या कॉलिंगमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या तपासामध्ये सायबर सेलच्या पथकाने उल्हासनगर जि. ठाणे येथील एक संशयीत इसमास ताब्यात घेतले असून त्याचेकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपूस सुरु आहे. तसेच सदर गुन्ह्यातील ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांनी आणखी कोणाला गैरप्रकारे सिमकार्ड विक्री केलेले आहे किंवा कसे ? तसेच विक्री केलेल्या सिमकार्ड व बैंक खात्याद्वारे भारतात किंवा विदेशात फसवणुक केलेली आहे किंवा कसे ? याबाबत देखील माहिती घेण्यात येत असुन गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत सुभाष पाटील, पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार मुकेश तावडे, मनोज नाईक, सुनिल येलवे, चंद्रशेखर बडगुजर, सचिन वसावे, मोहन ढमढेरे, पोलीस नाईक हितेश पाटील, पोलीस अंमलदार विजय गावीत, पवन पाटील, देविदास महाले, सुभाष वळवी, राहुल तडवी, प्रदीप पावरा यांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, सध्या सायबर गुन्ह्यांचे स्वरुपात फसवणुक करणाऱ्या इसमांकडुन नागरिकांच्या बनावट कागद पत्रांचा वापर करुन सिम कार्ड व बैंक फ्रॉड असे प्रकार वाढत असुन, नागरिकांनी त्या बाबत सतर्क राहणे गरजेचे असुन नागरिकांची सायबर संबधीत कुठल्या प्रकारची फसवणुक झाल्यास त्यांनी तात्काळ सायबर सेल येथे संपर्क साधावा.



