*मोलगी हद्दीत जबरी चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, एकुण 3 आरोपींसह 1 लाख 75 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मोलगी हद्दीत जबरी चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, एकुण 3 आरोपींसह 1 लाख 75 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत*
*मोलगी हद्दीत जबरी चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, एकुण 3 आरोपींसह 1 लाख 75 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत*
नंदुरबार(प्रतिनिधी):-19 नोव्हेंबर 2025 रोजी मोलगी पोलीस ठाणे हद्दीतील उर्मिलामाळ गावाजवळ फिर्यादी आकाश सुरेश जळोदकर वय- 26 वर्षे, व्यवसाय केंद्र मॅनेजर (फायनान्स कंपनी) रा. श्रीरामनगर अक्कलकुवा जि. नंदुरबार हे त्यांचे फायनान्स कंपनीचे कर्ज वसुलीचे रोख रक्कम सह त्यांच्या मोटारसायकलीने जमाना येथुन अक्कलकुवा येथे जात असतांना उर्मिलामाळ गावाजवळ चढाव- वळण रस्त्यावर 03 अज्ञात इसमांनी फिर्यादी यांची मोटारसायकल थांबवून फिर्यादीजवळील असलेल्या काळया रंगाची बॅग जबरदस्तीने हिसकावुन त्यातील फिर्यादी यांचेकडील रोख रक्कम, टॅबसह पळुन गेले म्हणुन मोलगी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 140/ 2025 भा.न्या. संहिता कलम 309(4), 3(5) अन्वये अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखे मार्फतीने समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नितीन वळवी व त्याच्या साथीदार यांनी मिळून केला असुन तो तळोदा येथील चिनोदा गावात आहे, बाबत खात्रिशीर माहिती मिळाल्याने जिल्हा पोलोस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच पथकास कारवाईकामी रवाना केले. मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार स्था. गु.शा. पथकाने तळोदा येथील चिनोदा येथे जाऊन सदर नितीन वळवी याचा शोध घेतला असता तो मिळुन आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नितीन वेस्ता वळवी, वय 29 वर्षे, रा. सल्लीबार, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार असे सांगुन त्यास सदर गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली दिली तसेच गुन्हयातील इतर साथीदारांची नावे सांगितली. त्यामध्ये आरोपी साथीदार कृष्णा विक्रमसिंग पाडवी, वय 24 वर्षे, रा.वाण्याविहीर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार, संदीप किरता वळवी, वय 23 वर्षे, रा. पिपरखंड पाडा, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार असे असुन नमुद साथीदारांचा देखील स्था.गु.शा. पथकाने शोध घेता तिनही आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांकडुन 85. 100 रुपये रोख रक्कम, 10,000 रुपये किमतीचा टॅब, 80,000 रुपये किमतीची गुन्हयात वापरलेली मोटारसायकल व इतर असा एकुण 1 लाख 75 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु असुन गुन्हयाचा तपास पोउपनि- सागर गाडीलोहार हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोहेकों/सजन वाघ, मनोज नाईक, मोहन ढमढेरे, पोकों/यशोदीप ओगले यांनी केली आहे.



