*जी टी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी टी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना दिवस साजरा*
*जी टी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना दिवस साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जी टी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना दिवस साजरा करण्यात आला. 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेर यांच्या आदेशान्वये व महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ एम जे रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय छात्र सेना दिवस निमित्त वंदे मातरम गीत व एनसीसी प्रतिज्ञा व शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य रघुवंशी यांनी राष्ट्रीय छात्र सेना एकक यांना शुभेच्छा दिल्या व देशासाठी समर्पण करणाऱ्या भारतीय सेनेला नमन करत राष्ट्रीय छात्र सैनिकांना उत्साहाने व देशासाठी पुढे येण्याचे आवाहन केले तसेच राष्ट्रीय सत्र सेनाचे बोधवाक्य एकता आणि अनुशासनचे आपल्या जीवनात सदैव पालन करण्याचे आवाहन सुद्धा केले. राष्ट्रीय छात्र सेना दिवस नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा करण्यात येतो तसेच राष्ट्रीय छात्र सेना ही एक भारतातील सर्वात मोठे युवा संघटन आहे त्याचा जन्म 1948 साली झाला या संघटनास सेकंड लाईन ऑफ डिफेन्स सुद्धा म्हटले जाते ही गर्वाची बाब आहे. राष्ट्रीय छात्र सेनेने एकेकाळी युद्धात सुद्धा आपला सहभाग नोंदवला आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, क्रीडा अधिकारी संजय बेलवलकर, ओंकार जाधव, क्रीडा विभागातील मुकेश बारी, काटे सर अधिकारी यांनीही उपस्थिती लावून सर्व छात्रसैनिकांना अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच विशेष प्राविण्य प्राप्त कॅडेट सागर अहिरे यास मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचा अंत राष्ट्रीय एकता व अखंडता जपणारे एनसीसी गीत हम सब भारतीय है याच्याने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. एम टी. शेवाळे यांचे सहकार्य लाभले व एनसीसी अधिकारी लेफ्ट. डॉ. विजय चौधरी यांनी संयोजन केले.



