*भांगरापाणी येथे ग्रामपंचायत कार्यालच्या बांधकामाला त्वरीत स्थगितीबाबत,ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*भांगरापाणी येथे ग्रामपंचायत कार्यालच्या बांधकामाला त्वरीत स्थगितीबाबत,ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन*
*भांगरापाणी येथे ग्रामपंचायत कार्यालच्या बांधकामाला त्वरीत स्थगितीबाबत,ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील भांगरापाणी येथे ग्रामपंचायत कार्यालच्या बांधकामाला त्वरीत स्थगिती करणे बाबत भांगरापाणी ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गृप ग्रामपंचायत भांगरापाणी अंतर्गत सात गावे असून भांगरापाणी, जामली, उमटी, पिंम्पटी, चनवाई, वेरी, पिंप्रापाणी इत्यादी या गावांचे ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले सदर ग्रामंपचायत कार्यालयाचे बांधकाम सुरु आहे.
परंतु सरपंच सोन्या टेंबऱ्या वसावे यांनी स्वःताच्या फायद्यासाठी कोणतीही लोकवस्ती नसलेल्या समाज उपयोगी जागा नसलेल्या ठिकाणी टेकडीवर एकांत ठिकाणी ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी जागा निवडली असून, त्या जागेची साफसफाई देखील केली आहे, तेथे ग्रामपंचायत इमारतीचा सातही गावातील लोकांना काही उपयोग होणार नाही, सदरची जागा स्थानिक ग्रामस्थांना किंवा सातही गावाच्या गावकऱ्यांना उपयोगी नाही, त्याठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय सुरक्षित राहील का ? लोकवस्तीत बांधकाम केले असते तर गावकरी संरक्षण करतील, कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी लोकं मदत करतील. या अगोदर सरपंचाने स्वतःच्या घराजवळ तलाठी कार्यालय बांधले. ते गुरांचा चारा ठेवण्यासाठी उपयोगात आणत आहे. कधी तेथे तलाठी किंवा लोक जात नाही. प्राथमिक उपकेंद्र त्यांच्या घराजवळ व पंचायत समिती सदस्यांचा घराजवळ बांधकाम करण्यासाठी जागा बनविली होती. सदर काम हे लोकप्रतिनिधी शासनासाठी करतात किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी काम करीत आहे हे कुठे आम्हाला समजले नाही, स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीप्रमाणे सदर ग्रामपंचायत कार्यालय हे ज्याठिकाणी आहे, त्याठिकाणी बांधकाम करावे. त्याच ठिकाणी समाज उपयोगी समाज मंदिर आहे. त्याच्याजवळ जियो टॉवर आहे. यापूर्वी प्राथमिक उपकेंद्र बांधकाम केले आहे. ते मध्यवर्ती ठिकाणी आहे जागा मालक विक्रमसिंग फत्तेसिंग पाडवी यांनी जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्यांचा वारसदार ईश्वर विक्रमसिंग पाडवी हे जागा देण्यासाठी तयार असून कोणतीही अडचण नाही, गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी शासनाची जागा उपलब्ध असून त्याच ठिकाणी जिल्हा परिषद शाळा, पशुसंवर्धन व आरोग्य उपकेंद्र बांधकाम केले आहे. अशा ठिकाणी जर बांधकाम केले तर सर्व सोयींयुक्त कार्यालय बनेल आणि सातही गावातील लोकांना व समाजाला उपयोगी पडेल. त्याठिकाणी विद्युत पुरवठा, मोबाईल टॉवर हे सर्व एकाठिकाणी उपलब्ध आहे. निवेदनावर बहादुरसिंह पाडवी, विलास वसावे, रिता वसावे, कलावती तडवी, बहादुरसिंह तडवी, इंद्रसिंग वसावे, कालुसिंग वसावे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



