*शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला यश, ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र शनिमंदिरासाठी 2 कोटींचा निधी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला यश, ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र शनिमंदिरासाठी 2 कोटींचा निधी*
*शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला यश, ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र शनिमंदिरासाठी 2 कोटींचा निधी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेंतर्गत साडेसाती मुक्तीपीठ असलेल्या नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील शनीमंदिरात अभिषेक हॉल व मंगल कार्यालय बांधकामासाठी ग्रामविकास विभागाने 1 कोटी 99 लाखांचा निधी मंजूर केला आहे. याबाबत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा केला होता त्यास यश आले आहे.
याबाबत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.
चंद्रकांत रघुवंशी यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (वर्ग ब)अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील श्रीक्षेत्र शनिमंदिर ग्रामीण यात्रा स्थळाच्या ठिकाणी विविध विकास कामांकरिता निधी उपलब्ध करून देणे बाबतचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाला देण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावावर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य निकष समितीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या बैठकीत विचार विनिमय करण्यात येऊन यात्रा स्थळाच्या ठिकाणी करावयाच्या कामांची अंदाजपत्रके व विविध कागदपत्रांच्या समितीने तपासणी अभिषेक हॉल बांधकामासाठी 99 लाख 99 हजार 790 रुपये तर मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी 99 लाख 99 हजार 343 रुपये असे एकूण 1 कोटी 99 लक्ष 99 हजार 133 रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आली त्याच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर शनीमंदिरात ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला त्यानंतर आमदार कार्यालयात शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी शनि महाराजांच्या जयजयकार करण्यात आला
याप्रसंगी मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव मोरे, संचालक रावण पाटील, हिम्मतराव पाटील, संतोष धनगर, हिरामण माळी, भास्कर पाटील, रमेश पवार, माजी सरपंच योगेश पाटील, अशोक पाटील, सुधीर पाटील, शत्रुज्ञ पाटील, शेतकी संघ संचालक संतोष पाटील, माजी सरपंच संतोष पाटील, बाजार समिती संचालक ठाणसिंग गिरासे, माजी ग्रा.पं सदस्य नत्थु पाटील, विष्णू पाटील, सुखदेव पाटील, विकासो चेरमन नामदेव पाटील, आनंदा पाटील, भास्कर पाटील, विठ्ठल पाटील, रतिलाल पाटील, अंकुश पाटील, समाधान पाटील, महेंद्र पाटील, वसंत पाटील संजय पाटील, माजी पं.स सदस्य वसंत भिल, फुला पाटील, आत्माराम पाटील, लोटन पाटील, महेंद्र पाटील, जगन्नाथ पाटील, सुभाष पाटील, मनोज पाटील आदी उपस्थित होते. शनिमांडळ हे
‘साडेसाती मुक्तीपीठ’ म्हणून ओळखले जाते आणि येथे असलेले शनि मंदिर हे साडेसातीतून मुक्ती मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात भाविक शनि अमावस्येच्या दिवशी विशेष गर्दी असते आणि साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी पूजा करतात. मंदिरासाठी अभिषेक हॉल व मंगल कार्यालय व्हावं यासाठी आपण शासन स्तरावरून वेळोवेळी पाठपुरावा करत गेलो त्याला यश आले असून,1 कोटी 90 लाख 99 हजारच्या निधी प्राप्त आहे. बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असून, भाविकांची सोय झाली असल्याचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.



