*मीरा रोड येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न, सत्यवान रेडकर यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा कानमंत्र*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मीरा रोड येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न, सत्यवान रेडकर यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा कानमंत्र*
*मीरा रोड येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न, सत्यवान रेडकर यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा कानमंत्र*
मुंबई(प्रतिनिधी):-मीरा-भाईंदर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भविष्यात विविध शासकीय नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे मार्गदर्शन शिबिर शिवमावळा प्रतिष्ठान व शंकर नारायण कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 22 नोव्हेंबर रोजी स. 10.30 वा. शंकर नारायण महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांना सत्यवान रेडकर वरिष्ठ अनुवाद अधिकारी केंद्रीय वस्तू व सेवा कर, मुंबई (भारत सरकार) यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेडकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केंद्र व राज्यांमध्ये असलेल्या नोकरीच्या संधी, त्यासाठी आवश्यक पात्रता, स्पर्धा परीक्षेची तयारी, एमपीएससी, यूपीएससी परिक्षेव्यतिरिक्त इतर विभागात अनेक नोकऱ्या विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शंकर नारायण महाविद्यालयाचे अध्यक्ष रोहिदास पाटील, सचिव महेश म्हात्रे, भूषण पाटील, शिवमावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक जयराम मेसे, अध्यक्ष सुभाष काशिद, सचिव नामदेव काशिद, मीरा भाईंदर मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष मनोज राणे, संतोष गोळे, बाळू वाघमारे, सलीम मुल्ला, स्वप्निल कांबळे, कृष्णा दरेकर, अजय शर्मा व इतर मान्यवर तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



