*के. आर. पब्लिक स्कुलमध्ये ‘भगवत गीता’ या विषयावर प्रबोधन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कुलमध्ये ‘भगवत गीता’ या विषयावर प्रबोधन*
*के. आर. पब्लिक स्कुलमध्ये ‘भगवत गीता’ या विषयावर प्रबोधन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल नंदुरबार येथे माधव सेवादास व रसप्रियदास यांच्या प्रवचणातुन विद्यार्थ्यांना ‘भगवत गीता’ या धार्मिक ग्रंथावर प्रबोधन केले, तसेच सकारात्मक
विचार आपल्या मध्ये असले पाहिजे. चांगले संस्कार असणे आवश्यक आहे. चांगल्या सवयी अंगीकृत असल्या पाहिजेत असे सांगितले. आपले कर्म आपण करीत राहणे, व भगवत गीतेचे सार आपल्या अंगी रुजवले पाहिजे. या वर आधारीत अनेक बोधपर कथा सांगितल्या. तसेच मन एकाग्र करण्यासाठी भगवत गीता चे पठन केले पाहिजे. असे त्यांनी सांगितले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाळेच्या प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी केले. तसेच संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी आलेल्या अतिथींचा शाळेत प्रवचनासाठी प्राचारण केल्या बद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.



