*शहादा येथील सराफाला लुटणारे सराईत आरोपी ताब्यात एकूण 38 लाख 96 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह 11 आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा येथील सराफाला लुटणारे सराईत आरोपी ताब्यात एकूण 38 लाख 96 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह 11 आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी*
*शहादा येथील सराफाला लुटणारे सराईत आरोपी ताब्यात एकूण 38 लाख 96 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह 11 आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी 10.10 वाजेच्या सुमारास शहादा पोलीस ठाणे हद्दीतील म्हसावद ते बुडीगव्हाण रोडवर बुडीगव्हाण गावाच्या पुढे रोडावर रितेश जयप्रकाश पारेख, व्यवसाय सराफ व्यवसाय, रा. सोनार गल्ली, मेनरोड, शहादा हे त्यांच्या चारचाकी वाहनाने म्हसावद येथे जात असतांना अज्ञात आरोपीतांनी रितेश पारेख यांच्या चारचाकी वाहनासमोर गाडी आडवी लावून त्यांच्याशी हुज्जत घालून सराफ व्यावसायीक यांना गाडीतून खाली उतरून त्यांच्या गाडीचा काचा फोडून बळजबरीने गाडीतून खाली उतरवून आरोपीतांच्या वाहनात कोंबुन अग्निशस्त्र व चाकुचा धाक दाखवून रितेश पारेख यांना मारहाण करुन त्यांचे चारचाकी वाहनासह अपहरण करुन रितेश पारेख यांच्या जवळील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने हिसकावून धुळे जवळील नवलनगर येथे त्यांना त्याच्या गाडीसह तेथेच सोडुन तेथुन एका विना क्रमांकाच्या मो. सा. वरुन पळुन गेले म्हणून शहादा पोलीस ठाणे येथे गुरनं 581/2024 भा.न्या.सं. 2023 चे कलम 310(2), 310 (4), 311, 138, 351,115(2) भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 प्रमाणे, 4 चे उल्लंघन 25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार व शहादा पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यापुर्वी 8 आरोपीतांना धुळे, अहिल्यानगर, जळगांव जिल्ह्यातून ताब्यात घेवून त्यांच्याकडून 5 लाख 36 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा पोलीस ठाणे येथे दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन संशयीत आरोपी विजय गायकवाड सलमान दोन्ही रा. धुळे हे त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी स्विफ्ट वाहनाने निजामपुर मार्गे नंदुरबार कडे येणार असलेबाबत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना मिळालेली हकीगत कळवून संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करणेबाबत आदेशीत केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विजय रामकृष्ण गायकवाड वय 38 वर्षे, रा. प्लॉट नं 12, रामनगर, अभय कॉलेज जवळ, धुळे ता. जि. धुळे, सोहेल ऊर्फ सलमान खलील खान वय 30 वर्षे, रा. चाळीसगांव रोड, गरीब नवाज नगर, धुळे ता. जि. धुळे, नाजीम ऊर्फ कबुतर मलक अब्दुल रहमान वय 38 वर्षे, रा. मिल्लत नगर, ड्रायव्हर सोसायटी, 100 फुटी रोड, धुळे ता. जि. धुळे यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून 16 लाख 65 हजार रुपये किमतीची 13.884 कि.ग्रॅ. चांदीचे दागिने, 5 लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन व 25 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे अग्निशस्व असा एकूण 21 लाख 90 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर गुन्ह्यात आज पावेतो एकूण 11 आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 38 लाख 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यातील काही फरार आरोपीतांचा शोध सुरु असून त्यांना ही लवकरात लवकर बेड्या ठोकण्यात येतील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी यावेळी सांगितले,
सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशित कांबळे, शहादा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, पोलीस नाईक नितीन गांगुर्डे, विकास कापुरे, पोलीस अंमलदार शोएब शेख, अभिमन्यु गावीत, भरत उगले, सतिष घुले शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार योगेश थोरात, देविदास विसपुते, घनशाम सुर्यवंशी, पोलीस नाईक दिपक चौधरी, पोलीस अंमलदार भगवान सावळे, प्रदीप वाघ, भरत शिंपी यांनी केलेली असून नंदूरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.



