*हुडको कॉलनी, नंदुरबार या ठिकाणी घेण्यात आलेल्या अधिमंडळाच्या विशेष बैठकीत, व्यवस्थापक समिती संचालकांची बिनविरोध निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हुडको कॉलनी, नंदुरबार या ठिकाणी घेण्यात आलेल्या अधिमंडळाच्या विशेष बैठकीत, व्यवस्थापक समिती संचालकांची बिनविरोध निवड*
*हुडको कॉलनी, नंदुरबार या ठिकाणी घेण्यात आलेल्या अधिमंडळाच्या विशेष बैठकीत, व्यवस्थापक समिती संचालकांची बिनविरोध निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार नगर परीषदेच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 अन्वये नोंदणी केलेल्या हुडको सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, नंदुरबार या संस्थेच्या सन 2025 - 26 ते सन 2030- 31 या कालावधीसाठी उपविधीतील तरतूदी प्रमाणे समितीची निवड होणेसाठी तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार जि. नंदुरबार यांच्या कडील आदेश क्र. आस्था निवडणूक / हुडको गृह संस्था/अध्यासी अधि.नि. आदेश / 156 36/ सन-2025 दि. 30.9.25 अन्वये श्रीमती संगीता चे. कोळी, मुख्य लिपीक अधिन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या 308 हुडको कॉलनी, नंदुरबार या ठिकाणी दि. 19.10.2025 रोज रविवारी घेण्यात आलेल्या अधिमंडळाच्या विशेष बैठकीत सभेस हजर सदस्यांच्या सर्वसंमतीने एकमताने एकूण 13 व्यवस्थापक समिती संचालकांची बिनविरोध निवड झाल्याचे प्राधिकृत अधिकारी श्रीमती संगीता चे.कौळी यांनी जाहिर केले. ते नवनिर्वाचीत संचालक 1 सर्वसाधारण मतदार संघातून पाटील सुकलाल विठोबा, कुलकर्णी नंदकुमार बलवंत, गुरव धनराज नारायण, पाटील विनायक राजाराम, कासार प्रकाश अभिमन्यू, पाटील अजय पितांबर, बच्छाव देविदास शंकर व मेहता हिमांशुकुमार नारायणशंकर, अनुसुचीत जाती व जमाती मतदार संघातून- नाईक भारती रोहिदास, वि.जाती/भटक्या जमाती किंवा विमाप्र मतदार संघातून बुवा छोटुपुरी दिगंबरपुरी, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून पाटील भटा खंडू व महिला राखीव मतदार संघातून मिस्तरी भारतीबाई योगेश व पटेल प्रियंका चेतन या प्रमाणे 13 संचालकांनी निवड करण्यात आलेली आहे. त्याच प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांची प्रथम सभा संस्थेच्या 300 हुडको कॉलनी, नंदुरबार या ठिकाणी दि. 2.11.2025 रोज रविवारी घेण्यात आली. त्या सभेस नवनिर्वाचीत सर्व संचालक हजर होते. या सभेत चेअरमन व व्हा चेअरमन पदासाठी निवड घेण्यात आली. चेअरमन या पदासाठी एकमेव अर्ज पाटील सुकलाल विठोबा यांनी दाखल केला. तसेच व्हा. चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज पाटील भटा खंडू यांनी दाखल केला. त्यांचीही निवड बिनविरोध झाल्याचे प्राधिकृत अधिकारी श्रीमती संगीता चे. कोळी यांनी जाहिर केले. संख्येच्या समितीच्या निवड प्रक्रियेच्या कामी कुलकणी नंदकुमार बलवंत व बच्छाव देविदास शंकर यांनी अधिक परिश्रम घेतले. या प्रमाणे समितीची निवड प्रक्रियेचे कामकाज पूर्ण करण्यात आली.



