*विभागस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत श्रॉफ हायस्कूलच्या खेळाडूंचे यश, राज्यस्तरीय स्पर्धेत 19 वर्षातील मुलींचे करणार नाशिक विभागाचे नेतृत्व*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विभागस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत श्रॉफ हायस्कूलच्या खेळाडूंचे यश, राज्यस्तरीय स्पर्धेत 19 वर्षातील मुलींचे करणार नाशिक विभागाचे नेतृत्व*
*विभागस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत श्रॉफ हायस्कूलच्या खेळाडूंचे यश, राज्यस्तरीय स्पर्धेत 19 वर्षातील मुलींचे करणार नाशिक विभागाचे नेतृत्व*
नंदूरबार(प्रतिनिधी):-येथील श्रॉफ हायस्कूलच्या खेळाडूंनी विभागस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. हे यशस्वी खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत 19 वर्षेआतील मुलींच्या गटात नाशिक विभागाचे नेतृत्व करणार आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या द्वारा व नंदुरबार जिल्हा रग्बी असोसिएशन नंदुरबार यांच्या विद्यमाने नंदुरबार तालुक्यातील पथराई येथील के. डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर विभागीय शालेय रग्बी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत धुळे, नाशिक, जळगाव येथील ग्रामीण व मनपाचे संघ उपस्थित होते, या स्पर्धेत 19 वर्षातील मुलींच्या वयोगटात नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत मुलींच्या पहिला सामन्यात हि.गो श्रॉफ हायस्कूलच्या मुलींच्या संघाने हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा येथील मुलींच्या संघाला 30-0 ने नमवले. अंतिम सामन्यात नूतन विद्या मंदिर देवळाली नाशिक या संघाला 25-10 ने हरवून विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. हा विजयी संघ 28 ते 30 नोव्हेंबरदरम्यान अहिल्यानगर येथील कोकणठाम येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेकरिता नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाबद्दल सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ॲड. रमणलाल शाह, सचिव डॉ. योगेश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका सीमा पाटील, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी यांनी खेळाडूंचे कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक जगदीश वंजारी, मनिष सनेर, हेमचंद्र मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.



