*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा नंदुरबारसाठी विकसित करण्यात आलेल्या अधिकृत मोबाईल एप्लिकेशनचे अनावरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा नंदुरबारसाठी विकसित करण्यात आलेल्या अधिकृत मोबाईल एप्लिकेशनचे अनावरण*
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा नंदुरबारसाठी विकसित करण्यात आलेल्या अधिकृत मोबाईल एप्लिकेशनचे अनावरण*
नंदूरबार(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा नंदुरबारसाठी विकसित करण्यात आलेल्या अधिकृत मोबाईल एप्लिकेशनच्या लोकार्पण कार्यक्रमाचे अनावरण नमन गोयल (IAS), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या हस्ते संपन्न झाले. अशा प्रकारचे एप्लीकेशन तयार करणारी नंदुरबार जिल्हा परिषद ही एकमेव ठरली आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे मूल्यमापन करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. मोबाईल एप्लिकेशनचे अनावरण प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये चंद्रकात पवार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नंदुरबार, उदयकुमार कुसुरकर उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) जि.प. नंदुरबार, देविदास देवरे गटविकास अधिकारी पंचायत समिती नवापूर, ए. के. बिऱ्हाडे, गटविकास अधिकारी पंचायत समिती नंदुरबार, संजय सोनवणे, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा, राजू किरवे गटविकास अधिकारी पंचायत समिती तळोदा, एस. व्ही. दसपुते विस्तार अधिकारी जि.प. नंदुरबार, RGSA कर्मचारी, सर्व ग्रामपंचायत विभाग कर्मचारी तसेच प्रवीण प्रशिक्षक परमेश्वर विठोबा गंडे आणि लीलेश्वर खैरनार यांची उपस्थिती होती.
मोबाईल एप्लिकेशन विकसित करण्यामागील उद्देश ग्रामपंचायतींच्या सध्याच्या कामकाजाचे, प्रगतीचे तसेच अभियानांतर्गत साध्य झालेल्या उपक्रमांचे नोंदणीकरण, मूल्यांकन आणि गुणांकन करणे हा आहे. अभियानाच्या कार्यकाळात झालेले काम प्रत्यक्ष पुराव्यांसह नोंदवून त्याचे विश्लेषण करण्यासाठी मुख्य प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. या प्रश्नावलीमध्ये एकूण 8 प्रमुख घटक समाविष्ट असून त्यानुसार एकूण 100 गुणांच्या आधारे ग्रामपंचायतींचे अंतिम मूल्यांकन करण्यात येणार आहे. गुणांकन विषय एकूण 100 गुण चे असून सुशासनयुक्त पंचायत (Good Governance) - 16 गुण, सक्षम पंचायत 10 गुण, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव (Climate Action) 19 गुण, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण 6 गुण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण 16 गुण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय- 23 गुण, लोकसहभाग व श्रमदान 5 गुण, नाविन्यपूर्ण उपक्रम 5 गुण असे गुणांकन असणार आहे.
ग्रामपंचायतींसाठी अपेक्षित भूमिका ग्रामपंचायतीने अभियानांतर्गत केलेले दैनंदिन काम एप्लिकेशनमध्ये अद्यतनित करणे, संबंधित पूरक कागदपत्रे, छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक आहे. माहितीच्या आधारे अॅप ग्रामपंचायतीची अभियानातील सद्यस्थिती व गुणांकन दर्शविणार आहे. एप्लिकेशन विकसित करणारे डेव्हलपर व प्रशिक्षण देणारे प्रवीण प्रशिक्षक परमेश्वर विठोबा गंडे व लीलेश्वर खैरनार, जि.प. नंदुरबार यांना नमन गोयल (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. नंदुरबार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे. अभियान मध्ये तालुका स्तरावत प्रथम क्रमांक गुण ग्रामपंचायतला 18 लक्ष, द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत ला 12 लक्ष, तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतला 8 लक्ष पुरस्कार रक्कम असणार आहे. जिल्हा स्तरावत प्रथम क्रमांक गुण ग्रामपंचायत ला 50 लक्ष, द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत ला 30 लक्ष, तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायत ला 20 लक्ष पुरस्कार रक्कम असणार आहे. विभाग स्तरावत प्रथम क्रमांक गुण ग्रामपंचायत ला 1 कोटी, द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत ला 80 लक्ष, तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायत ला 60 लक्ष पुरस्कार रक्कम असणार आहे. राज्य स्तरावत प्रथम क्रमांक गुण ग्रामपंचायत ला 5 कोटी, द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत ला 3 कोटी, तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायत ला 2 कोटी पुरस्कार रक्कम असणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा नंदुरबारसाठी विकसित करण्यात आलेल्या अधिकृत मोबाईल एप्लिकेशनचे अनावरण आज करण्यात आले. मोबाईल एप्लिकेशन विकसित करण्यामागील उद्देश ग्रामपंचायतींच्या सध्याच्या कामकाजाचे, प्रगतीचे तसेच अभियानांतर्गत साध्य झालेल्या उपक्रमांचे नोंदणीकरण, मूल्यांकन आणि गुणांकन करणे हा असून जास्तीत जास्त ग्रामपंचायत अभियानात सक्रीय सहभागी होतील हा आहे.



