*प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे नूतन दरवाजाचे माताजींच्या हस्ते उद्घाटन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे नूतन दरवाजाचे माताजींच्या हस्ते उद्घाटन*
*प्राचीन जैन अतिशय क्षेत्राचे नूतन दरवाजाचे माताजींच्या हस्ते उद्घाटन*
कुसुंबा(प्रतिनिधी):-येथील श्री 1008 कुंथुनाथ दिगंबर जैन प्राचीन अतिशय क्षेत्राचे जिर्णाध्दार काम अनेक दिवसांपासून प्रतिष्ठाचार्य मधुर शास्त्री प्रदीप जैन यांच्या मंगल सानिध्यात व त्यांच्याच सहकार्याने आणि प.पु. आचार्य प्रसन्नसागरजी महामुनीश्री सहसंघ तसेच प.पु.आचार्य वर्धमान सागरजी सहसंग तसेच कुसुंबा गौरव असलेले मुनिश्री. प.पु. समाधी सागरजी मुनीश्री प.पु. आचार्य मयंक सागरजी मुनिश्री प.पु. आचार्य दयाऋषी मुनीश्री आणि खान्देशातील मुनीश्री आदी तपस्वी त्यागी वृंदांचे मंगल आशीर्वादाने जिर्णोद्धार काम जवळजवळ पुर्णत्वास येत असून क्षेत्राचे नूतन दरवाजाचे उद्घाटन कुसुंबा क्षेत्रावरती चातुर्मास्थित असलेल्या तपस्वीवृंद प.पु. आर्यिका रत्न सुनयमाताजींच्या हस्ते नूतन दरवाजाचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी प.पु. सुपर्व सागरजी महाराज तसेच शेकडो भाविकांची उपस्थिती होती अशी माहिती क्षेत्राचे विश्वस्त आणि खान्देश जैन समाजाचे प्रसिद्ध प्रमुख सतीश वसंतीलाल जैन तसेच महेंद्र हिरालाल जैन यांनी दिली. दरवाजाचे नक्षीकाम तसेच क्षेत्रात मनमोहून टाकणारे शिल्प सौंदर्य त्याच्या मुद्रा व त्यांचे हावभाव शब्दात गुंफणे फार कठीण आहे. देवळाची भव्यता समोर उभाच राहिलेल्या भाविकांचा मनात कायमचा ठसा उमटवल्याशिवाय राहत नाही. यासाठी खान्देशातील एकमेव प्राचीन अतिशय जैन क्षेत्राच्या दर्शनासाठी विविध राज्यातून भाविकांचा ओघ सदैव दिसून येतो. पार्श्वनाथ सेवासमिती पदाधिकारी व समाज बांधव विशेष दक्षता घेत असतात. प्रदीप शास्त्री यांच्या तर्फे पेढे वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.



