*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या अस्तित्वासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचा लढा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या अस्तित्वासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचा लढा*
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाच्या अस्तित्वासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचा लढा*
मुंबई(प्रतिनिधी):-कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण नावाची मुंबईहून/मुंबईकडे येणाऱ्या- जाणाऱ्या रेल्वे स्थानकात ऊद्घोषणा आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर नामफलक जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई या प्रकारे महाराजांच्या नावाच्या अस्तित्वासाठी लढा देण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ आणि शिष्टमंडळ यांनी गुरूवारी दिनांक 20 नोव्हेंबर सकाळी 11 मि.वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्थानक मुंबई येथील वरिष्ठ वाणिज्य मंडळाचे मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक अधिकारी प्रवीण वंजारी यांना भेटून सदर निवेदन देण्यात आले. तशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी आश्वासन दिले येणाऱ्या 45 ते 60 दिवसांमध्ये आम्ही या सर्व गोष्टींची पूर्तता नक्कीच करू तसेच संघटनेसही लेखी उत्तर देवू. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेल्या संदर्भातील निवेदन लोकप्रतिनिधी यांच्याकडेही देण्यात आले, मा. खा. संजीवजी नाईक, मा. खा. नरेश मस्के, मा. खा. राजन विचारे, मा. अविनाश जाधव (मनसे नेता), आ. संजय केळकर या महोदयांचे लाख मोलाचे योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य संघटनेस लाभले. सदर निवेदन पत्रक देताना संघटनेचे प्रमुख सल्लागार राजू कांबळे, सचिव दर्शन कासले, सल्लागार तुषार साळवी, सदस्य नामदेव चव्हाण, मिलिंद सावंत, हनुमंत निकम, साहिल सकपाळ, तुषार ताम्हणकर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.



