*जिल्ह्यातील नऊ अनाथ बालगृहातील मुलांसाठी ओणीत 30 रोजी आनंद मेळावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यातील नऊ अनाथ बालगृहातील मुलांसाठी ओणीत 30 रोजी आनंद मेळावा*
*जिल्ह्यातील नऊ अनाथ बालगृहातील मुलांसाठी ओणीत 30 रोजी आनंद मेळावा*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील ओणी येथील वात्सल्य मंदिर बालकाश्रम येथे रविवार दि.30 नोव्हेंबर रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे ओणी संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील अनाथालय, बालगृहातील अनाथ, निराधार मुलांकरिता या आनंद मेळाव्याचे आयोजन असून मेळाव्याचे हे 5 वेळ वर्ष आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास नऊ निराधार अनाथ बालगृह कार्यरत आहेत. यामध्ये विविध वयोगटातील जवळपास दोनशेपेक्षा जास्त अनाथ मुले मुली वास्तव्यास आहेत.एक दिवस या मुलांसाठी जगणे, समरस होऊन त्यांना धीर देणे. त्यांचे मनोबल वाढवणे कोणीही या जगात, समाजात एकटे नसून आपण सगळे आपल्या आयुष्याला सुंदर आकार देण्यासाठी एकत्र राहून सोबत कायम अविरत कटिबद्ध राहुया हा प्रेमळ विश्वास देण्यासाठी या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या आनंद मेळाव्याला आर्थिक मदत करण्यासाठी महेंद्र मोहन -९४२३८० ४९२७, सुवर्णा राघव - ९५११८४०६८९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



