*नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील एकुण 18 गुन्हेगार इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची कारवाई*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील एकुण 18 गुन्हेगार इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची कारवाई*
*नंदुरबार शहरातील दोन टोळयांमधील एकुण 18 गुन्हेगार इसम जिल्हयातुन 2 वर्षांसाठी हद्दपार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांची कारवाई*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील काही गुन्हेगारी टोळयांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारी हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने हद्दपारची प्रभावी कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत दोन वेगवेगळ्या टोळयांमधील एकुण 18 आरोपी इसमांना जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे. नंदुरबार शहर परिसरात अलीकडच्या काळात काही गुन्हेगारी टोळया ज्यांचेवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असुन त्यामध्ये, जिवे ठार मारण्याचा (खुनाचा) प्रयत्न करणे, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, शासकीय नोकरास अटकाव करुन शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, फौजदारीपात्र कट रचणे, जातीय दंगल करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दंगा करणे, चोरी करणे, शिवीगाळ व दमदाटी करणे, इच्छापुर्वक गंभीर दुखापत करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, इतर असे गुन्हे दाखल असतांना देखील सदर टोळयांमधील गुन्हेगारांनी त्यांचे गुन्हेगारी कृत्य सुरुच असल्याने सर्वसाधारण जनतेच्या जिवीतास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण होऊन जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सदर गुन्हेगारी टोळयांवर हद्दपार प्राधिकरण अधिकारी तथा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी त्यांचे विशेष अधिकाराचा वापर करुन शहरातील दोन वेगवेगळया टोळयांमधील टोळी प्रमुख व इतर अशा खाली नमुद एकुण 18 आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये 2 वर्षांसाठी हद्दपारची कारवाई केली आहे.
टोळी क्रमांक 1- बबलु काल्या ऊर्फ शेख शाहेबाज शेख शरफुद्दीन, वय 31 वर्षे, रा.अली साहब मोहल्ला, नंदुरबार (टोळी प्रमुख), सलाम लतिफ शेख, वय 25 वर्षे, रा.घोडापिर मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), शेख शाहरुख बाबु कुरेशी, वय 29 वर्षे, रा. अली साहब मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), सलमान खान जमालखान पठाण (बेलदार), वय 32 वर्षे, रा. बिसमिल्ला चौक, नंदुरबार (टोळी सदस्य), केफ अब्दुल रहेमान, वय 26 वर्षे, रा. मन्यार मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), साहिल ऊर्फ मस्तान रोकडा युसूफ शहा, वय 21 वर्षे, रा. अली साहब मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), फहीम मोहम्मद शेख (पत्रकार), वय 35 वर्षे, रा. सुतार मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), रिवाज सैय्यद ऊर्फ रियाज लंबा सैय्यद अहमद, वय- 35 वर्षे, रा.चिराग गल्ली, नंदुरबार (टोळी सदस्य), HCP पिंट्या ऊर्फ रेहानउद्दीन रहिमउद्दीन काझी, वय 31 वर्षे, रा.चिराग गल्ली, नंदुरबार (टोळी सदस्य), कुरेशी नबील कुरेशी जलील, वय- 26 वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), सर्फराज ऊर्फ मांजऱ्या सर्फराज बेलदार, वय 21 वर्षे, रा. बिस्मिल्ला चौक, नंदुरबार (टोळो सदस्य), साबीर मोहम्मद ऊर्फ काल्या आरिफ मोहम्मद भिस्ती, वय 21 वर्षे, रा. पत्राचक्की, घोडापिर मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), जाकीर आरिफ भिस्ती, वय 22 वर्षे, रा. पत्राचक्की, घोडापिर मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), अलबक्ष फकिरा शेख, वय 21 वर्षे, रा.अली साहब मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य), नविद ऊर्फ उपाधी फकिरा कुरेशी, वय 19 वर्षे, रा.अली साहब मोहल्ला, नंदुरबार (टोळी सदस्य)
टोळी क्रमांक- 2, सद्दाम शेख अजिज शेख (मिस्तरी), वय 33 वर्षे, रा. चिराग गल्ली, नंदुरबार ह.मु. सिव्हील हॉस्पीटल, घरकुल, नंदुरबार (टोळी प्रमुख), शेख शाहरुख शेख अजिज, वय 28 वर्षे, रा. चिराग गल्ली, नंदुरबार (टोळी सदस्य), रेहेमान शरिफ मिस्तरी, वय 25 वर्षे, रा.चिराग गल्ली, नंदुरबार (टोळी सदस्य)



