*नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान, ई- केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन-निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान, ई- केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन-निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी*
*नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे 53.99 लाखांचे अनुदान, ई- केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन-निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर 2025 महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या मोठ्या नुकसानीनंतर शासनाने तातडीची मदत म्हणून 53 लक्ष 99 हजार रुपये (रुपये त्रेपन्न लाख नव्व्याण्णव हजार मात्र) इतक्या अनुदानाची तरतूद करून ती डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिली आहे. एकूण 918 शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान नोंदवले गेले असून, त्यापैकी 603 शेतकऱ्यांना 36 लक्ष 85 हजार 120 रुपये (रुपये छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे वीस मात्र) अनुदान वितरित करण्यात आले आहे. शिल्लक 315 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले ई-केवायसी (E-KYC) पूर्ण केल्यास त्यांचे अनुदान तात्काळ खात्यात जमा होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशा संघवी यांनी दिली. तालुकानिहाय मदत वाटपात अक्कलकुवा तालुक्यात 148 शेतकऱ्यांना 1 लक्ष 19 हजार 850 रुपये (रुपये एक लाख एकोणीस हजार आठशे पन्नास) वितरित झाले असून 87 शेतकऱ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. अक्राणीमध्ये 98 शेतकऱ्यांना 47 हजार 175 रुपये (रुपये सत्तेचाळीस हजार एकशे पंचाहत्तर) वाटप झाले असून 94 ई-केवायसी प्रलंबित आहेत. नंदुरबार तालुक्यात 270 शेतकऱ्यांना 17 लक्ष 42 हजार 270 रुपये (रुपये सतरा लाख बेचाळीस हजार दोनशे सत्तर) मिळाले असून 54 अद्यापही शेतकऱ्यांनी ई- केवायसी करणे आवश्यक आहे. नवापूरमध्ये 172 शेतकऱ्यांना 4 लक्ष 46 हजार 080 रुपये (रुपये चार लाख छेचाळीस हजार ऐंशी) अनुदान मिळाले असून 40 जणांचे ई-केवायसी अद्याप अपूर्ण आहे. शहादा तालुक्यात 77 शेतकऱ्यांना 3 लक्ष 51 हजार 870 रुपये (रुपये तीन लाख एकावन्न हजार आठशे सत्तर) तर तळोदा तालुक्यात 153 शेतकऱ्यांना 9 लक्ष 77 हजार 875 रुपये (रुपये नऊ लाख सत्याहत्तर हजार आठशे पंच्याहत्तर) मदत वितरित झाली असून अनुक्रमे 21 व 19 शेतकऱ्यांचे ई-केवायसी बाकी आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ऍग्रीस्टॅक नोंदणी शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी. आगामी काळात ई-पंचनामा पद्धत लागू होणार असल्याने ऍग्रीस्टॅक नोंदणी सर्व खातेधारक शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक ठरणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासनाच्या आपत्ती मदत प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशा संघवी यांनी केले आहे.



