*राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 23 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 23 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी*
*राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 23 नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने 19 वर्षाआतील राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 23 नोव्हेंबर 2025 रोजी नंदुरबार जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व सातारा जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या विद्यमाने 18 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान म्हसवडमाण ता.जि. सातारा येथे 19 वर्षाखालील 5 वी राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी 19 वर्षाखालील गटात नंदुरबार जिल्ह्यातील मुले व मुलींचा संघ सहभागी होणार आहेत. ज्या खेळाडूंचा जन्म 1 जानेवारी 2007 किंवा त्यानंतरचा असेल, अशा खेळाडूंनी 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजेपासून ते सकाळी 10.30 वाजेपर्यंत नंदुरबार येथील विरल विहार खोडाई माता मंदिर रोडवरील आनंदी कृपा क्रिकेट क्लबच्या प्रांगणात नंदुरबार जिल्हा संघ निवड चाचणीसाठी उपस्थित राहून नाव नोंदणी करुन घ्यावी. खेळाडूंनी सोबत पुरावा, म्हणून जन्म दाखला प्रमाणपत्र (झेरॉक्स), आधारकार्ड (झेरॉक्स) किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट सोबत घेऊन यावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव संदिप खलाणे (मो.9420917907), दिनेश महाले (मो. 8208557574), जयेश राजपूत (मो. 9049600017), श्रीकांत चव्हाण (मो.9146736282) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नंदुरबार जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.



