*नंदुरबार जिल्ह्यातील 28 खेळाडू मुला मुलींची विभागीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील 28 खेळाडू मुला मुलींची विभागीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड*
*नंदुरबार जिल्ह्यातील 28 खेळाडू मुला मुलींची विभागीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नंदुरबार जिल्हा कुराश असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कुराश स्पर्धा एस.ए. मिशन हायस्कूल जिमखाना येथे आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेचे उद्धघाटन नंदुरबार जिल्हा कुराश असोसिएशनचे अध्यक्ष विवेक पालिकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेंट मदर तेरेसा इंग्लिश स्कूल चे क्रीडा शिक्षक संतोष मराठे, मनोज चौहान, गणेश मराठे, भरत चौधरी, मंगलदास पाटील, अनिल सोनवणे, प्रिती पालीकर, निता मराठे आदी उपस्थित होते. स्पर्धेला पंच म्हणून विशाल सोनवणे, समीर मोहम्मद, नरेंद्र बिरारे, ओम गोसावी यांनी काम केले. स्पर्धेचे निरीक्षण नंदुरबार जिल्हा कुराश असोसिएशनचे सचिव योगेश माळी यांनी केले. 14 वर्षा आतील मुलींमध्ये 35 ते 40 किलो वजन गटात राजनंदिनी वावरे प्रथम तर 17 वर्षा आतील मुलींमध्ये 44 किलो वजन गटात भूमि मराठे, धनश्री पाटील, अजंता वसावे जानवी न्हावी प्रथम आल्या. तसेच 14 वर्षा आतील मुलांमध्ये पियूष पाटील, योगेश वसावे प्रथम आले तसेच 17 वर्षाआतील मुलांमध्ये सक्षम पाटील, चिराग कुंवर, आकाश भलकारे, मोहित वळवी, हर्षल पटेल, शनिराज पाडवी प्रथम आले. 21 व 22 नोव्हेंबर रोजी चाळीसगाव येथे होणाऱ्या विभागीय शालेय कुराश स्पर्धेसाठी झाली आहे. सूत्र संचालन गणेश मराठे यांनी केले तर आभार योगिता बैसाने मॅडम यांनी मानले.



