*युवतीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*युवतीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात*
*युवतीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल करणारा आरोपी पोलीसांच्या ताब्यात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील पिडीत महिला फिर्यादी हीस मागील दोन वर्षांपासुन तिचे ओळखीच्या हिमांशु राजेंद्र पाटील, याने पिडीतेसोबत प्रेमसंबंध निर्माण करुन तिचेवर खुप प्रेम असल्याचे भासवून तिची फसवणुक करुन पिडीतेचे अश्लील व्हिडीओ तिचे विनापरवानगी रेकॉडींग करुन त्या सोशल मिडीयावर व्हायरल केल्या होत्या, त्याअन्वये पिडीत महिलेचे फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 177/2025 भा.न्या. संहिता कलम 75, 76, 351 सह माहिती तंत्रज्ञान अधि. कलम 66 (ई), 67 वगैरे अन्वये दि. 17/11/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश देसले यांचेकडे देण्यात आला होता. पोनि योगेश देसले यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लागलीच तपासाला गती देत गुन्हयातील आरोपी नामे हिमांशु राजेंद्र पाटील, वय 21 वर्षे, रा.मोहिदे, ता. शहादा जि. नंदुरबार यास ताब्यात घेतले. तसेच त्याचा साथीदार (विधीसंघर्षग्रस्त बालक) यास मा. बाल न्यायमंडळापुढे हजर करण्यात आले आहे. नमुद गुन्हयातील आरोपीने पीडीतेची परवानगी न घेता तिचे अश्लील व्हिडीओ तयार करुन ते सोशल मिडीयावर प्रसारित केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन आरोपीच्या या कृत्यामुळे पीडीतेची मानहानी होऊन तिला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याने पोलीसांकडून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे. "तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारचे अश्लील फोटो अथवा व्हिडीओ विनापरवानगी काढणे किंवा ते प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा असुन असे करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी दिला आहे." सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी तथा शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी रविंद्र बागुल, पोना/देविदास विसपुते यांनी केली आहे.



