*अक्कलकुवा तालुक्यातील घंटांनी व डाब येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अक्कलकुवा तालुक्यातील घंटांनी व डाब येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट*
*अक्कलकुवा तालुक्यातील घंटांनी व डाब येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट*
नंदूरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील घंटाणी अंगणवाडी केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र डाब येथे सरप्राइज भेट दिली, भेटीदरम्यान अंगणवाडी केंद्रातील बालकांची आरोग्य तपासणी सुरू होती, आहाराबाबत चौकशी केली, यावेळी डाब येथील प्राथमिक केंद्रातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते, तेथील औषध साठा, लसीकरण, रुग्ण सेवा याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी गटविकास अधिकारी विजय अहिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत निकुंभे, विस्तार अधिकारी पंचायत टी के खरे, उपअभियंता बांधकाम जयदीप ठाकरे व उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा तुषार वाघ उपस्थित होते.