*जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाट्न सप्पन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाट्न सप्पन्न*
*जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाट्न सप्पन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार द्वारा व जी टी पाटील महाविद्यालय यांच्या सहकार्याने जीटीपी पाटील कॉलेज येथील बॅडमिंटन हॉलमध्ये जिल्हा युवा महोत्सव उत्साहात पार पडला. सदर युवा महोत्सवात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, विज्ञान प्रदर्शन (नवोपक्रम) कौशल्य विकास मध्ये चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, कविता लेखन, कथालेखन इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 200 पेक्षा जास्त युवक युवती यांनी सहभाग घेतला. सदर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाटनकरीता जी टी पाटील महाविद्यालयचे प्राचार्य महेंद्र रघुवंशी अध्यक्षस्थानी होते. तसेच बळवंत निकुंभ शिवछत्रपती पुरस्कारार्थी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते व महेश पाटील तालुका क्रीडा अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संजय बेलोरकर क्रीडा अधिकारी, ओमकार जाधव क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार, व कार्यालयीन कर्मचारी मुकेश बारी व महेंद्र काटे यांनी परिश्रम घेतले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ मनोज शेवाळे व आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर यांनी केले.



