*“शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भारतीय किसान संघ सज्ज — नंदुरबार जिल्हा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय”,केंद्रीय मंत्री बाबुभाई पटेल यांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या समस्या, पीकविमा, सिंचन, बाजा
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*“शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भारतीय किसान संघ सज्ज — नंदुरबार जिल्हा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय”,केंद्रीय मंत्री बाबुभाई पटेल यांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या समस्या, पीकविमा, सिंचन, बाजा
*“शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भारतीय किसान संघ सज्ज — नंदुरबार जिल्हा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय”,केंद्रीय मंत्री बाबुभाई पटेल यांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांच्या समस्या, पीकविमा, सिंचन, बाजारभाव, आणि जिल्हा संघटन बळकटीकरणावर सखोल चर्चा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय किसान संघ नंदुरबार जिल्ह्याची महत्त्वपूर्ण जिल्हा बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय सुदर्शन कुंज, नंदुरबार येथे उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीस भारतीय किसान संघाचे केंद्रीय मंत्री बाबुभाई पटेल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. बैठकीच्या प्रारंभी परम पूजनीय भारत माता आणि शेतकऱ्यांचे आराध्य दैवत भगवान बलराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून बैठकीची सुरुवात करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय मंत्री बाबुभाई पटेल यांनी नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय किसान संघाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या, मागण्या, कर्जव्यवस्था, पीकविमा, बाजारभाव, सिंचन पाणी व्यवस्थापन, तसेच शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेल्या पुढील उपाययोजना यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच, जिल्ह्यातील किसान संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरही त्यांनी वस्तुनिष्ठ चर्चा करत संघटन मजबूत करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या. यावेळी या बैठकीत प्रांत मंत्री
सुभाष महाजन, प्रांत सदस्य साहेबराव पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, जिल्हा मंत्री प्रसाद बेहेरे, जिल्हा कोषाध्यक्ष मधुकर माळी, जिल्हा सहमंत्री प्रशांत अहिरे, तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य हर्षद पत्की, तुकाराम धनगर, विजयभाऊ गोसावी, सुपड्या ठाकरे, देविदास महाजन यांचा समावेश होता.
त्याचबरोबर विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत विशेष संपर्क सहप्रमुख व प्रगतिशील शेतकरी विजयराव सोनवणे यांचीही विशेष उपस्थिती बैठकीची शोभा वाढवणारी ठरली. पहिल्या सत्रानंतर कार्यकर्त्यांसोबत सहभोजन आयोजित करण्यात आले. भोजनानंतर दुसऱ्या सत्रात जिल्ह्यातील संघटनात्मक विस्तार, नवीन सदस्य नोंदणी, गावपातळीवरील बैठका, तसेच पुढील तिमाही कार्य योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत जिल्ह्यातील आगामी उपक्रम आणि शेतकरी जनजागृती मोहिमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली.



