*संवाद 2025 ट्रायबल कॉन्क्लेवमध्ये खानदेशाचा ठसा; धुळे–नंदुरबारच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय स्तरावर कमावली दाद*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संवाद 2025 ट्रायबल कॉन्क्लेवमध्ये खानदेशाचा ठसा; धुळे–नंदुरबारच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय स्तरावर कमावली दाद*
*संवाद 2025 ट्रायबल कॉन्क्लेवमध्ये खानदेशाचा ठसा; धुळे–नंदुरबारच्या प्रतिनिधींनी राष्ट्रीय स्तरावर कमावली दाद*
जमशेदपूर(प्रतिनिधी):-धरती आबा बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती आणि टाटा स्टील फाउंडेशनने आयोजित केलेल्या “संवाद 2025 ट्रायबल कॉन्क्लेव" मध्ये विविध राज्यांतील आदिवासी समुदाय सहभागी झाले. या भव्य राष्ट्रीय संमेलनात धुळे– नंदुरबार जिल्ह्याचे खानदेशातील प्रतिनिधी विशेष ठरले. डॉ.विजय पवार, डॉ.हिरा पावरा, धर्मजित पावरा, अॅड. बाजीराव पावरा, डॉ. जितेंद्र भंडारी, गौतम खर्डे (पोलिस पाटील), अविनाश पवार आणि कवी संतोष पावरा यांच्यासह आठ जणांच्या चमूने खानदेशाची ओळख, संस्कृती आणि आरोग्य विषयक जागरूकता राष्ट्रीय पातळीवर अधोरेखित केली. या कॉन्क्लेवमध्ये देशभरातील 26 राज्यांतील 153 जनजातींचे 250 पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारतातील विविध आदिवासी समूहांची परंपरा, संस्कृती, कला, वनौषधी आणि ज्ञानपद्धती एका मंचावर प्रदर्शित करण्याचे हे एक मोठे व्यासपीठ ठरले. कार्यक्रम परिसरात जमशेदपूर शहर प्रेक्षकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 34 आदिवासी कला शैली दुकाने, 51 हस्तकला स्टॉल्स, 30 हर्बल मेडिसिन प्रदर्शन, 24 जनजाती वैद्यांच्या पारंपरिक उपचार पद्धतींची प्रात्यक्षिके मांडणी करण्यात आली. ट्राबल कल्चर सेंटरमध्ये आयोजित आरोग्य सत्रात खानदेशातील तीन डॉक्टरांनी डॉ. हिरा पावरा, डॉ. विजय पवार आणि डॉ. जितेंद्र भंडारी यांनी सिकल सेल अॅनिमिया या गंभीर आनुवंशिक आजारावर सखोल माहिती दिली. त्यांनी रोगाचे इतिहास, निदान प्रक्रिया, उपचार पद्धती, सिकल सेल रोखण्यासाठी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील आव्हाने, सिकल सेल आजारावर जनजागृतीचे महत्त्व यावर प्रभावी प्रेझेंटेशन सादर केले. त्यांच्या समुपदेशनाला कॉन्क्लेवमधील विविध राज्यांतील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक आरोग्य कार्यकर्त्यांनी या सत्रातून प्रेरणा घेत आपल्या राज्यांमध्ये सिकल सेल प्रतिबंध कार्यक्रम राबवण्याची इच्छा व्यक्त केली. सांस्कृतिक विभागात गौतम खर्डे पावरा (आडगाव, शहादा) आणि त्यांच्या चमूने सादर केलेले “होळी नृत्य” विशेष आकर्षण ठरले. खानदेशातील पारंपरिक पावरा संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या या नृत्यप्रस्तुतीला मोठ्या प्रमाणात वाहवा मिळाली. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताश्यांचे सूर आणि नृत्याचे ताल पाहून प्रेक्षक भारावून गेले. कॉन्क्लेवमध्ये कवी संतोष पावरा यांच्या “आदिवासी पहचान” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आदिवासी ओळख, संघर्ष आणि आत्मगौरव यावर आधारित हे पुस्तक युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या भव्य आयोजनासाठी टाटा स्टील फाउंडेशनचे सि.ई. ओ. सौरव रॉय, तसेच जिरेन टोपनो, नेहा सिंह आणि ज्योतिन चौधरी—यांचे विशेष योगदान होते. संपूर्ण व्यवस्थापन, आदिवासी समाजाशी संवाद, विविध राज्यांतील समन्वय आणि सांस्कृतिक उपक्रमांमधील नियोजन यासाठी खानदेशातील प्रतिनिधींनी त्यांचे मनापासून आभार मानले.



