*नंदुरबार येथे आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कायदा जनजागृती मेळावा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार येथे आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कायदा जनजागृती मेळावा संपन्न*
*नंदुरबार येथे आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कायदा जनजागृती मेळावा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पुर्वीच्या आई वडीलांनी आपल्या पाल्यांना वेळ दिला म्हणून आपली पीढी संस्कारीत निघाली. आजची परिस्थीती गंभीर आहे. असे सांगूण शालेय शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थी जिवनातच बालकांना सुसंकारीत केले पाहिजे असे मत बटेसिंग रघुवंशी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. डी. चौधरी यांनी व्यक्त केले. आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने माता पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण कायदा जन जागृती मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. येथे अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, निसर्ग नियमांचे पालन न केल्याने अनैतीकता वाढत असल्यानेच कायदयाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. नैतीकता जर प्रबल असेल तर कायद्याची गरज पडत नाही. आई वडीलांच्या संन्मान होणे यासाठी ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा असल्याचे ते म्हणाले. जन जागृती मेळाव्याचे प्रमुख अतिथी, अग्रवाल समाजाचे अध्यक्ष, आणि शहराचे उद्योगपती सुरेश अग्रवाल यांनी सभेला संबोधीत करतांना श्रीराम श्रावणबाळ यांचे उदाहरणे देवून आपली संस्कृती किती उज्वल आहे असे स्पष्ठ केले. ज्येष्ठांना मानसन्मान मिळावा त्यांच्या साठी असलेल्या सुवीद्धांची हक्कांची माहिती व्हावी त्यासाठी आम्ही पन्नास हजार पुस्तीका छापून मोफत वाटू ईच्छितो. अशी इच्छिा व्यक्त केली. त्यासाठी लागणारी आवश्यक माहिती संकलीत करण्यासाठी संस्थेने सहकार्य करावे. ज्येष्ठांना मार्गदर्शन प्राप्त व्हावे अशी जनजागृती आम्ही करू इच्छितो असे ही त्यांनी स्पष्ठ केले.
विधी सेवा प्राधिकरणाच्या मुख्य लोक अभिरक्षक अॅड. सिमा खत्री यांनी आपल्या प्रास्तवीक भाषणातून सांगीतले की, भारतदेश संस्कारक्षम व उच्च संस्कृतीचा आहे. श्रीरामाने वडीलांचा मान राखुन वनवास पत्करला व एक आदर्श निर्माण केला परंतु विदेशी संस्कृतीचे फाजील अनुकरण करून आजची तरूणपीढी भरकटत असल्याचे सांगूण आर्थीक परिस्थिती उत्तम असलेले मोठी पदे भुषवीणारे व्यक्तींचेच आई वडील वृद्धाश्रमात जीवन कंठत आहेत. असा खेद व्यक्तकरीत ज्येष्ठांना उत्तम सवलती आहेत. त्याची माहिती करून घेवून ज्येष्ठ नागरिक समाधानाने जगुशकतात. अशी जनजागृती करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मोबाईल अॅपद्वारे ज्येष्ठांनी आपल्या अडचणी सोडवून समाधानकारक जीवन जगावे असे आवाहनही त्यांनी केले. अॅड गजमल वसावे, सहा. लोक अभिरक्षक यांनी पालक व ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्यातील प्रमुख कलमांची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणास कळवा त्यांच्या अडचणी सोडवीण्यासाठी त्यांना मोफत वकील सेवा पुरविली जाईल असे नमुद केले. आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बारकू पाटील आणि जिल्हा पेंशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मधुकर साबळे यांनीही सभेला मार्गदर्शन केले. विधी सेवा प्राधिकरणाच्या सहाय्यक लोक अभिरक्षक अॅड. शुभांगी चौधरी यांनी सुत्रसंचालन केले तर उत्तमराव नेरकर यांनी आभार मानले. शंकरलाल अग्रवाल, आत्माराम इंदवे संस्थेचे सल्लागार अॅड. महंमद पठाण आणि सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि अजयसिंग गिरासे, दिलीप साळुखे, डी. डी. चौधरी, देविदास बच्छाव, देविदास शिंपी, सुरेश कोळी आणि प्रमोद पाटील यांच्या परिश्रमातून कार्यक्रमाची सांगता झाली.



