*अल्पवयीन बालिकेसोबत अश्लील चाळे करणारा विधी संघर्ष बालक पोलीसांच्या ताब्यात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अल्पवयीन बालिकेसोबत अश्लील चाळे करणारा विधी संघर्ष बालक पोलीसांच्या ताब्यात*
*अल्पवयीन बालिकेसोबत अश्लील चाळे करणारा विधी संघर्ष बालक पोलीसांच्या ताब्यात*
नंदूरबार(प्रतिनिधी):-23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजेच्या सुमारास गंगापूर गावात राहणारा इसम याने गावातील 03 वर्षीय अल्पवयीन बालिकेस कुरकुरेचा पुडा दाखवून तिस बोलावून कडेवर बसवून गावातीलच अधर्वट बांधकाम झालेल्या घरात नेवून तिच्यासोबत अश्लील चाळे करून तो पसार झाल्या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुरनं. 408/2025 भारतीय न्याय संहितेचे कलम 76 सह पोक्सो कलम 8,10,12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत सुभाष पाटील यांनी लागलीच समांतर तपास सुरु करत नमुद संशयीचा शोध घेतला असता तो 15 वर्षीय विधी संघर्ष ग्रस्त बालक असल्याचे समजून आले. त्यास तपास पथकाने 24 तासाचे आत ताब्यात घेवून तपास अधिकारी सपोनि/दिनेश भदाणे यांनी बाल न्यायमंडळ समक्ष हजर केले असता त्यास दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी पावेतो रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेमंत सुभाष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे नंदुरबार तालुका पोलीस ठाणे, पोउनि मुकेश पवार, पोउनि विकास गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.



