*नवापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत दि एन.डी.ॲण्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नवापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत दि एन.डी.ॲण्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन*
*नवापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत दि एन.डी.ॲण्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन*
नवापूर(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार व जिल्हा क्रीडा परिषद, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन नवापूर येथे श्रीमती प्र.अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूलमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत 14, 17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित, दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथील एकूण 27 खेळाडूंनी विविध गटांमध्ये दमदार कामगिरी करून यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, एकाग्रता व खेळाडूवृत्तीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. 14 वर्षांखालील गट मुले व मुली गटात नैतिक कुमार गामीत (चतुर्थ), जानवी राणा (तृतीय), साक्षी प्रजापत (चतुर्थ). 17 वर्षांखालील गट मुले व मुली गटात अंकित पंचवानी (द्वितीय), निलेश पटेल (पाचवा), नौशिन काझी (द्वितीय), मुस्कान आमलीवाला (तृतीय), जानवी गोकलानी (पाचवी). 19 वर्षांखालील गट मुले व मुली गटात परिमल हिंगु (द्वितीय), तुलसी प्रजापत (तृतीय), नंदिनी कश्यप (चतुर्थ), उमेहानी तल (पाचवी). या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडाशिक्षक निलेश गावंडे व श्रीकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल दि नवापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विपिनभाई चोखावाला, उपाध्यक्ष शिरीष शाह, कार्याध्यक्षा श्रीमती शितलबेन वाणी, सचिव राजेंद्र अग्रवाल, सहसचिव शोएब मांदा, कोषाध्यक्ष सतीश शाह यांच्यासह व्यवस्थापन मंडळातील सर्व सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार जाधव, उपमुख्याध्यापिका श्रीमती कमल परिख, उपप्राचार्य नरेंद्र पाटील, पर्यवेक्षिका श्रीमती निजला सोनवणे व पर्यवेक्षक जाहीद खान पठाण यांनी विजेत्यांचे कौतुक करून नंदुरबार येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.