*डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था, पाचलची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था, पाचलची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था, पाचलची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
.राजापूर(प्रतिनिधी):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पाचल यांची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 5 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य सैनिक कै. गो. बा. नारकर सभागृहामध्ये संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत बा. जाधव हे होते प्रथम महामानवाच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करण्यात आले उपस्थित सर्व सभासद संचालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर संस्थेचे चेअरमन चंद्रकांत जाधव यांनी प्रास्ताविक केले यामध्ये पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनंतर सचिव साहील बने यांनी मागील सभेचे इतिवृत वाचन केले. 31 मार्च 2025 अखेरची पत्रके नफा तोटा ताळेबंद पत्रक लेखा परीक्षण अहवाल व समितीचा अहवाल हा सभागृहामध्ये वाचण्यात आला त्याला सर्व सभासदांनी मान्यता दिली. या वर्षांमध्ये झालेला जो नफा होता तो लाभांश म्हणून सभासदांना पाच टक्के इतका जाहीर करण्यात आला. सन 2024 25 चा दोष दुरुस्ती अहवाल सभागृहासमोर वाचून तो मंजूर करण्यात आला या सभागृहामध्ये काही सूचना करण्यात आल्या त्या अशा लाभांश हा इमारत नीधी मध्ये समावेश करण्यात यावा असा अशी सूचना सुनील जाधव यांनी मांडली त्याचप्रमाणे संचालक मंडळातील जे सदस्य व त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना दिलेल्या कर्जाची वसुलीची नोंद यामध्ये सर्वांसमोर करण्यात आली शासकीय लेखा परीक्षक म्हणून राजापूर येथील राजू राणे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे अंतर्गत हिशेब तपासणीस म्हणून रमेश चापले यांची नियुक्ती करण्यात आली उपविधी दुरुस्ती मध्ये या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र पाचल पुरते मर्यादित होते ते वाढवून राजापूर तालुका कार्यक्षेत्र वाढवण्याचे सर्वानुमते करण्यात आले त्याचप्रमाणे पंचवीस लाख भाग भांडवल मर्यादा वाढवण्याचा सुद्धा या सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला या सर्वसाधारण सभेमध्ये पतसंस्थेचे चेअरमन चंद्रकांत जाधव, व्हाईस चेअरमन प्रकाश पांगरीकर, संचालक प्रमोद जाधव, गणपत परुळेकर, राजेश जाधव, योगिता जाधव, मंगला कांबळे, सचिव साहिल बने, वसुली अधिकारी रमेश चापले, पिग्मी एजंट विदिशा जाधव, रिकरिंग एजंट सुनिता जाधव, त्याचप्रमाणे प्रतिष्ठित सर्व सभासद सुनील जाधव, गौतम पांगरीकर, शिवाजी जाधव, सिद्धार्थ पाचलकर, दत्ताराम जाधव, नरेश कांबळे, विलास परुळेकर, तानाजी मासये, उदय पांगरीकर आदी सभासद उपस्थित होते. केशव जाधव, किसन जाधव जनार्दन जाधव, सुभाष सरफरे,सौ प्रिती चंद्रकांत जाधव, प्रज्ञा जाधव, प्रमिला जाधव, रेष्मा जाधव, प्रतिभा पांगरीकर, आशा बहुसंख्य सभासदांनी सुध्दा आपला सहभाग नोंदवला शेवटी संचालक प्रमोद जाधव यांनी आभार मानले.