*मराठ्यांच्या ओबीसी प्रवर्गात घुसखोरी विरोधात कुणबी समाजाच्या विविध संघटनांची कुणबी वसतीगृह मुलुंड येथे आज तातडीची बैठक*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
*मराठ्यांच्या ओबीसी प्रवर्गात घुसखोरी विरोधात कुणबी समाजाच्या विविध संघटनांची कुणबी वसतीगृह मुलुंड येथे आज तातडीची बैठक*
*मराठ्यांच्या ओबीसी प्रवर्गात घुसखोरी विरोधात कुणबी समाजाच्या विविध संघटनांची कुणबी वसतीगृह मुलुंड येथे आज तातडीची बैठक*
मुंबई(प्रतिनिधी):-राज्य सरकारने मराठा समाजाच्या आंदोलन हत्याराच्या दबावाला बळी पडून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊन ओबीसी आरक्षण संपुष्टात आणण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातला आहे. मराठा कुणबी म्हणून ओबीसीत दाखल होण्यासाठी तातडीने अंमलबजावणी समिती युध्दपातळीवर काम करत आहे. ओबीसी भटके- विमुक्त, बलुतेदार अलुतेदार, विशेष मागास प्रवर्गावर होणाऱ्या या घोर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संघाध्यक्ष श्री अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती सामाजिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
सदर बैठक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कुणबी विद्यार्थी वसतिगृह मुलुंड, प्रबोधन हाॅल, डॉ आंबेडकर नगर, 90 चंचचं रोड मुलुंड पूर्व येथे होणार आहे. या सभेला कुणबी युवा मंडळ, महिला मंडळ, कुणबी विवाह सल्लागार मंडळ, संलग्न मंडळे, तालुका, शाखा, पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचसोबत कुणबी जिल्हा समन्वय समित्या, कुणबी समाजाच्या विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती कुणबी समाजोन्नती संघ मुंबई सरचिटणीस कृष्णा वणे यांनी केली आहे.