*दिवंगत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना मरणोत्तर विधानसभा स्मृतीप्रित्यर्थ पत्र प्रदान*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दिवंगत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना मरणोत्तर विधानसभा स्मृतीप्रित्यर्थ पत्र प्रदान*
*दिवंगत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना मरणोत्तर विधानसभा स्मृतीप्रित्यर्थ पत्र प्रदान*
सुरगाणा(प्रतिनिधी):-मालेगाव ,दिंडोरी लोकसभेचे दिवंगत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना मरणोत्तर विधानसभा स्मृतीप्रित्यर्थ पत्र नाशिक येथील निवासस्थानी जाऊन शासनाच्या वतीने प्रदान करण्यात आले. यामध्ये चव्हाण यांची शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कारकीर्द नमूद करण्यात आली आहे. कै. हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचा जन्म 25 डिसेंबर 1951 रोजी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात प्रतापगड येथे झाला. त्यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले होते. त्यांनी राजकीय कारकीर्दस प्रतापगडचे सरपंच, नाशिक जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण सभापती, मालगव्हाण आदिवासी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाचे संचालक, 1995 मध्ये पेठ, सुरगाणा मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. 2004, 2009 व 2014 मध्ये लोकसभेवर निर्वाचित झाले. तसेच महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी कार्य केले. अशा या जेष्ठ समाज सेवकाचे गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी दु:खद निधन झाले.दु:खद निधना बद्दल विधानसभेत सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी एकमताने शोक प्रस्ताव संमत केला आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली अशा आशयाचे स्मृती पत्र जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या आदेशान्वये सुरगाणा तहसिलदार रामजी राठोड, नायब तहसिलदार मोहन कुलकर्णी, सुयोग वाघमारे यांनी नाशिक निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी कलावती चव्हाण, मुलगा समीर चव्हाण, पद्मावती चौधरी, सुभाष भोये, शंकरराव कसबे, रामदास चव्हाण यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. कुटुंबियांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत. दरम्यान चव्हाण यांनी विधानसभेत व लोकसभेत जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडत सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. हरसुल, मालेगाव दंगली शमविण्यासाठी शासनाच्या वतीने संकटमोचक म्हणून काम पाहिले. तसेच धनगरांना आरक्षण देण्यात आमचा कोणत्याही विरोध नाही मात्र आदिवासी अनुसूचित जमातीचे आरक्षणास कडाडून तीव्र विरोध करीत आदिवासींचे आरक्षण दिल्यास प्रसंगी आदिवासी नक्षलवादी बनतील अशा इशारा देत सडेतोड उत्तर लोकसभेत दिले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळा सरकार अल्पमतात असतांना रुग्णालयातून पायाचे हाड मोडले असतांना केवळ पक्षनिष्ठा बाळगून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एअर एम्बुलन्सने दिल्ली येथे गेले होते. शेतकऱ्यांचे कांदा, द्राक्ष या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.