*पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित, वनवासी विद्यालय व एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा येथे शिक्षकदिन साजरा*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित, वनवासी विद्यालय व एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा येथे शिक्षकदिन साजरा*
*पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित, वनवासी विद्यालय व एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा येथे शिक्षकदिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित, वनवासी विद्यालय व एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा येथे 4 सप्टेंबर 2025 रोजी शिक्षकदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वतीच्या व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने व स्वागत गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद चिंचोले व पर्यवेक्षक प्रेमळ पाडवी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती विजया न्हाईदे यांनी केले व प्रमुख वक्ते म्हणून कांतीलाल वसावे यांनी शिक्षकांच्या उदात्त ज्ञानदानाचे वर्णन करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या दिवशी मुख्याध्यापिका कु. खुशी नायिका व पर्यवेक्षिका कु. राधिका वसावे यांनी कार्यभार सांभाळला व इयत्ता 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतच्या वर्गांना अध्यापनाचे कार्य केले. इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त मनोगते व कविता सादर केले. अध्यक्षीय मनोगतात प्रमोद चिंचोले यांनी गुरु- शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. आपल्याला जगण्यासाठी योग्य मार्ग दाखविणाऱ्या व नेहमी प्रेरित करणाऱ्या शिक्षकांचे योगदान आपल्या जीवनात मोलाचे आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नंदिनी पाटील व कु. प्रांजल पाडवी यांनी केले तर आभार कु. सृष्टी वळवी यांनी मानले. सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संदीप महाले व सर्व सदस्य यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास नटावदकर यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.