*केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील ‘जीएसटी’ परिषदेची 56 वी बैठक संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील ‘जीएसटी’ परिषदेची 56 वी बैठक संपन्न*
*केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील ‘जीएसटी’ परिषदेची 56 वी बैठक संपन्न*
नवी दिल्ली (प्रतिनिधी):-केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील ‘जीएसटी’ परिषदेच्या 56 व्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले. शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘जीएसटी’ परिषदेने ट्रॅक्टरवरील जीएसटी 5 टक्के तसेच जैविक कीटकनाशके, खते, सिंचन साधने आणि शेती यंत्रसामुग्रीवरील कर 12 टक्के किंवा 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतीचा खर्च कमी होईल. देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारे निर्णय ‘जीएसटी’ परिषदेत घेण्यात आले आहेत. या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. देशातील शेतकरी, लघु-मध्यम उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना यामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळेल – मंत्री तटकरे
सर्वसामान्यांशी संबंधित साबण, डिटर्जेंट, टाल्कम पावडर, टूथपेस्ट, टूथब्रश, तयार कपडे, पादत्राणे आणि सौंदर्य प्रसाधनांवरील करात लक्षणीय कपात झाली आहे. खत निर्मितीतील नायट्रस ॲसिड, अमोनिया, वस्त्रोद्योगातील सूत आणि चामड्यावरील कर कपातीमुळे शेती आणि वस्त्रोद्योगाला नवे बळ मिळेल. सर्व व्यक्तिगत आरोग्य आणि जीवनविमा सेवा पूर्णपणे करमुक्त होणार असल्याने विमा क्षेत्र अधिक सर्वसुलभ होईल. सर्व औषधांवरील जीएसटी 12 टक्के किंवा 18 टक्के वरून 5 टक्के करण्यात आला असून, काही जीवनावश्यक औषधे पूर्णपणे करमुक्त झाली आहेत. सिमेंटवरील जीएसटी 28 वरून 18 टक्के, लहान प्रवासी वाहने आणि मालवाहतूक वाहनांवरील कर 18 टक्के निश्चित झाला असून, टीव्ही, एअर कंडिशनर यांचाही कर 18 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयांमुळे पायाभूत सुविधा, वाहन उद्योग आणि निर्यात क्षेत्राला गती मिळेल, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला.