*पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ‘भारत ब्रँड’ च्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ‘भारत ब्रँड’ च्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ*
*पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ‘भारत ब्रँड’ च्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ*
मुंबई(प्रतिनिधी):-‘भारत ब्रँड’ च्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे झाला. यावेळी नाफेड च्या वतीने राज्य प्रमुख भव्या आनंद उपस्थित होत्या. केंद्र सरकारच्यावतीने नाफेडच्या माध्यमातून ‘भारत ब्रँड’ची उत्पादने सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याचाच भाग असलेली भारत ब्रँडची आटा (गव्हाचे पीठ), तांदूळ आणि कांदा ही उत्पादने राज्यात सहकारी ग्राहक भांडारच्या सहयोगातून सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले.
मंत्री रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही फिरती वाहने विक्रीकरीता रवाना करण्यात आली. तर, प्रातिनिधिक स्वरुपात ग्राहकांना या उत्पादनांचे वितरण करण्यात आले. भारत ब्रँडचा 3 रा टप्पा लाँच होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री रावल यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यामुळे गरजेच्या वस्तू किफायती दरात सर्वसामान्यांना मिळणार असल्याचे सांगितले.