*आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आश्रमशाळांमधील शिक्षक भरती यासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आश्रमशाळांमधील शिक्षक भरती यासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न*
*आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली आश्रमशाळांमधील शिक्षक भरती यासंदर्भात मंत्रालयात बैठक संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-आदिवासी शासकीय आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर अतिरिक्त तासिका घेण्याबाबत वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीस आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, आदिवासी विकास विभागातील सर्व अप्पर आयुक्त, सर्व प्रकल्प अधिकारी, आश्रमशाळा मुख्याध्यापक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत होता. हे लक्षात घेऊन शासनाने बाह्यस्रोत पद्धतीने शिक्षकांची तत्काळ नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. बाह्यस्रोताद्वारे नियुक्त शिक्षकांनी संबंधित आश्रमशाळेत तातडीने कार्यभार स्वीकारणे आवश्यक आहे, असेही मंत्री वुईके यांनी यावेळी सांगितले.