*अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2025 मध्ये जामीया आय.टी.आयचे घवघवीत यश*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2025 मध्ये जामीया आय.टी.आयचे घवघवीत यश*
*अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2025 मध्ये जामीया आय.टी.आयचे घवघवीत यश*
नंदूरबार(प्रतिनिधी):-जुलै 2025 मध्ये झालेल्या ऑल इंडिया ट्रेड टेस्ट परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात जामिया आय. टी.आय.ने प्रथम आणि द्वितीय वर्ष व्यवसाय अभ्यासक्रमातील विभिन्न व्यसयात शंभर टक्के यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे प्राचार्य अकबर पटेल व उप प्राचार्य पटेल इलियास यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सर्व निदेशकाचेही अभिनंदन केले. प्रचार्यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना अभ्यासाची जाणीव करून प्रात्यक्षिक व स्किलवर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या मेहनती सोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन व संस्थेच्या व्यवस्थापनाचा पाठ पुरावा या यशामागे महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ह्यावर्षी प्रथम वर्षासाठी एकूण 131 विद्यार्थी व अंतिम वर्षासाठी एकूण 230 असे एकूण 361 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ह्यामध्ये सर्वांनी यश संपादन केले. अंतिम वर्षाच्या निकालामध्ये अनुक्रमे कॉलेज मधून विजतंत्री/इलेक्ट्रिशियन व्यवसायाचा विद्यार्थी सय्यद परवेज अली ह्याने 96.34% टक्के घेऊन प्रथम, तर सोलार टेकनिशियन मधून पाडवी प्रितेश ह्याने 94. 33% टक्के घेऊन द्वितीय, आणि विजतंत्रीचा फारुकी मो. समी 94.17% टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकवीला असून, प्रथम वर्ष परीक्षामध्ये मोटार मेकॅनिक विहिकल ट्रेडमधून कॉलेज मध्ये अनुक्रमे
बेलदार मोह.रजा 96.31%प्रथम,
खान काझीम 96% द्वितीय, वळवी अंकित 95.00% तृतीय क्रमांक पटकवीला. सर्व यश संपादित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मौलाना हुझेफा वस्तानवी व उपाध्यक्ष मौलाना अवैस वस्तानवी शुभेच्छा दिल्या. सोबतच प्रस्तावित जी. एम वस्तानवी विद्यापीठाचे कुलगुरू सय्यद अकील शाह यांनी शुभेच्छा दिल्या.