*सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या इसमास न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 5 हजारांचा दंड*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या इसमास न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 5 हजारांचा दंड*
*सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या इसमास न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 5 हजारांचा दंड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तळोदा पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक सुरेश भिमराव सोनवणे हे सहकारी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह तळोदा शहरात 24 जानेवारी 2020 रोजी शुक्रवार बाजार निमित्ताने सरकारी वाहनव्दारे गस्त करत असतांना, तळोदा शहारातील भन्साली प्लाझा मार्केटजवळ एका इसमाने त्याच्या जवळ असलेली मोटार सायकल रस्त्यावर उभी केलेली दिसल्याने पोलीस उपनिरीक्षक सुरेश भिमराव सोनवणे यांनी सदर इसमाचे नाव विचारून त्याचेकडे ड्रायव्हींग लायन्सस व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने सदर पोलीस अधिकारी यांच्यासोबत हुज्जत घालून कागदपत्रे सादर न करता त्यांना दमदाटी करत दुखापत केली होती. त्याअन्वये किशोर अभिमन्यू गावीत, वय-36 रा. टेंभारी, ता.तळोदा, जि. नंदुरबार याच्याविरुध्द तळोदा पोलीस ठाणे येथे फिर्यादी पोउपनि सुरेश भिमराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 23/2020, भा.द. वि. कलम 353 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास तळोदा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड यांनी अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने करत महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपी किशोर अभिमन्यू गावीत यास तात्काळ अटक करुन आरोपीविरुध्द मुदतीत दोषारोपपत्र सत्र न्यायालय, शहादा येथे सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति, जिल्हा व सत्र न्यायाधीश, शहादा एस. सी. पठारे यांच्या समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी किशोर अभिमन्यु गावीत यांच्या विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, एस. सी. पठारे, शहादा यांनी भा.द.वि.क. 353 अन्वये दोषी ठरवत आरोपीस 6 महिने सश्रम कारावास व 5,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति, सरकारी अभियोक्ता अॅड. स्वर्णसिंह गिरासे यांनी पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि हेमंत मोहिते, पोउपनि गणेश वसावे तसेच पैरवी अंमलदार पो.हे.कॉ. गणेश सावळे, पो.कॉ. देविदास सुर्यवंशी आणि पो.हे.कॉ. शैलेंद्र प्रकाश जाधव यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा सुभाष भोये यांनी अभिनंदन केले आहे.