*नगर पालिका व महानगरपालिका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा नंदुरबार यांच्याद्वारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नगर पालिका व महानगरपालिका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा नंदुरबार यांच्याद्वारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण संपन्न*
*नगर पालिका व महानगरपालिका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा नंदुरबार यांच्याद्वारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा नंदुरबार यांच्याद्वारे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल वाघ साहेब मुख्याधिकारी नगरपालिका नंदुरबार तर प्रमुख उपस्थितीत भावेश सोनवणे प्रशासन अधिकारी नगरपालिका शिक्षण मंडळ हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून करणसिंग चव्हाण राज्य संघटक, शिरीष पवार नाशिक विभागीय कार्याध्यक्ष, जमील मोमीन उपाध्यक्ष नाशिक विभाग, केंद्रप्रमुख रणजीत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमतः मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेचे व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष सचिन आव्हाड यांनी केले. संघटना तीन वर्षापासून सदर उपक्रम राबवीत असून कुठलाही प्रस्ताव न मागवता संघाद्वारे गठीत समिती आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करत असते. यानंतर मुख्याधिकारी राहुल वाघ साहेब प्रशासनाधिकारी भावेश सोनवणे व सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरीत करण्यात आले. उर्दू माध्यमातून काझी मुद्दस्सीर जईम अहमद यांना, मराठी माध्यमातून मनीषा काशिनाथ धनगर, न. पा. प्राथ. शाळा क्र. 7 नंदुरबार यांना तर गुजराती माध्यमातून फिलीप अर्जुन मावची प्रभारी मुख्याध्यापक न. पा. प्राथ. शाळा क्र. 3 नंदुरबार यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास जिल्ह्यातील पदाधिकारी सचिव मयूरकुमार सूर्यवंशी, श्रीम. संजोगता वसावे, शगुफ़्ता खान, लिलेश गोसावी, संतोषकुमार सदाराव यांचे प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे भावेश सोनवणे यांनी हिऱ्यांतून हिरे निवडणे हे जिक्रीचे कार्य आहे आणि अशा या सर्व हिऱ्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. अध्यक्षीय मनोगतातून मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत दोन अंकी पटसंख्या असलेल्या शाळा तीन अंकी शाळेत आणणारे शिक्षक खरोखर कौतुकास पात्र आहेत. राष्ट्रनिर्माण आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य शिक्षक करीत असतात त्यांना प्रेरणा हे पुरस्काराच्या स्वरूपात मिळत असते असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोषकुमार सदाराव तर आभार प्रदर्शन मयूरकुमार सूर्यवंशी यांनी केले.