*दिव्यांग शाळा व कर्मचारी संघटना संदर्भात शासन उदासीन, संघटनेची नाराजी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दिव्यांग शाळा व कर्मचारी संघटना संदर्भात शासन उदासीन, संघटनेची नाराजी*
*दिव्यांग शाळा व कर्मचारी संघटना संदर्भात शासन उदासीन, संघटनेची नाराजी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-कास्ट्राईब कर्मचारी महासंघ दिव्यांग शाळा व बालगृह कर्मचारी संघटनाच्या महाराष्ट्र राज्य कमेटी आज नंदुरबार जिल्ह्यात आली होती. विजयकुमार ढवळे कार्याध्यक्ष, विशाल असोदे, मुख्य संघटक व वरिष्ठ उपाध्यक्ष, शिवाजी बिबराळे,सचिव,सचिन वारनुळकर, सल्लागार यांच्या उपस्थितीत आज दिव्यांगांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांच्या संदर्भात विविध गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी चालवल्या जाणाऱ्या शाळांकडे शासन सातत्याने दुलक्ष करीत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
बैठकीत सांगण्यात आले की, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांना आवश्यक तेवढा निधी वेळेवर उपलब्ध होत नाही. शिक्षक व कर्मचारी वर्गाला वेतन मिळण्यात होत असलेला विलंब, शाळांच्या इमारती व वसतिगृहांच्या अपुऱ्या सोयीसुविधा, शैक्षणिक साहित्याचा अभाव अशा अनेक अडचणींमुळे शाळा चालवणे कठीण होत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या शैक्षणिक हक्कांवर गदा येऊ नये म्हणून शासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. शाळांना आवश्यक तो निधी वेळेवर द्यावा आणि पायाभूत सुविधा सुधाराव्यात, अशा मागण्या या बैठकीत करण्यात आल्या.
यावेळी काकुमाय बहुउद्देशिय अपंग सेवा संस्था संचलित मतीमंद मुलींची शाळा गुरुकुल नगर नंदुरबार या शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कोळी यांची जिल्हाअध्यक्ष म्हणुन नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर कुवर, अविनाश सोनवणे वरीष्ठ समाजकल्याण निरीक्षक, विवेक चव्हाण समाज कल्याण निरीक्षक, प्रभाकर चौधरी, बाजीराव पाटील, अभय पाटील, विनोद चौधरी, योगेश सावळे, ज्ञानेश्वर कोळी सहकार्य सर्व मतीमंद प्रवर्ग, मुकबधिर प्रवर्ग,अंध प्रवर्ग, अस्थिव्यंग प्रवर्ग आणि शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.