*नंदुरबारच्या झुलेलाल साई मंडळात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते महाआरती*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारच्या झुलेलाल साई मंडळात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते महाआरती*
*नंदुरबारच्या झुलेलाल साई मंडळात पोलीस अधीक्षकांच्या हस्ते महाआरती*
नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील जुनी सिंधी कॉलनी परिसरातीलझुलेलाल साई मंदिरात महाआरती करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना आरतीचा मान देण्यात आला.
सिंधी कॉलनी परिसरातील पूज्य झुलेलाल साई मंदिरात सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल साई मूर्तीचे पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दर्शन घेऊन विधीवतपणे पूजन केले. याप्रसंगी मंदिराचे पुरोहित गौतम ठाकूर व मंदिर समितीचे अध्यक्ष श्यामलाल चंचलानी यांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या सत्कार केला. सिंधी समाज लाल साई ग्रुपतर्फे स्थापित करण्यात आलेल्या झुलेलाल साई स्वरूपातील आकर्षक गणेश मूर्तीचे पूजन आणि आरती श्रवण दत्त यांनी केली. गणेशोत्सवानिमित्त आयोजित छप्पन भोग व महाप्रसाद वितरण दात्यांचा लकी ड्रॉ पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यांच्या हस्ते नावे काढण्यात आली.
मंडळाचे अध्यक्ष गिरीश अशोक कुमार नाथानी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना साई मूर्ती आणि शाल श्रीफळ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, राज्य कर्मचारी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार खानवाणी व मान्यवरांचा श्री लालसाई ग्रुपतर्फे सन्मान करण्यात आला. पुरोहित राम शर्मा यांनी तर प्रास्ताविक संदीप काकुस्ते यांनी केले.
याप्रसंगी लाल साई ग्रुपचे उप अध्यक्ष
सुंदर मुकेश कुमार नाथानी, राहुल साधानी, ओम भक्तयापुरी, पियुष कुकरेजा, सोनी विरवाणी, दौलत वाधेवा, यांनी संयोजन केले. या कार्यक्रमास संजीव पाटील, संजय नाथांनी, मुकेश पोपटानी, अनमोल मंगलानी, जतिन सीतपाल विशाल नाथानी, राजा गुरु बक्षानी, गिरीश नंदवानी, दिनेश खटवानी, मुकेश कुकरेजा, विजय दावांनी, राजेश छाबडा, हरेश मोटवानी, तसेच महिला पदाधिकारी हेमांशी वाधेवा, रेश्मा नाथानी, अनीता साधानी, दिशा चंचलानी, भूमी नंदवानी प्राची करड़ा तान्या चंचलानी यांच्यासह सिंधी समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.