*संविधान दिनानिमित्त कुणबी युवा मुंबई आयोजित विशेष जाहीर व्याख्यान उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*संविधान दिनानिमित्त कुणबी युवा मुंबई आयोजित विशेष जाहीर व्याख्यान उत्साहात संपन्न*
*संविधान दिनानिमित्त कुणबी युवा मुंबई आयोजित विशेष जाहीर व्याख्यान उत्साहात संपन्न*
मुंबई(प्रतिनिधी):-भारतीय संविधानाच्या मूल्यांची जनजागृती व्हावी, नागरिकांना आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव व्हावी, तसेच युवकांमध्ये संवैधानिक विचारांची रुजवण व्हावी, या उद्देशाने कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी युवा मुंबई यांच्या वतीने 26 नोव्हेंबर 2026 रोजी संविधान दिनानिमित्त विशेष जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात "भारताचे संविधान” या विषयावर अँड. अमित कटारनवरे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाची निर्मिती, संविधानातील मूलभूत मूल्ये, नागरिकांचे हक्क व अधिकार, कर्तव्ये आणि लोकशाही व्यवस्थेतील प्रत्येक नागरिकाची भूमिका याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले. या कार्यक्रमाला युवा अध्यक्ष युवराज कांबळे, उपाध्यक्ष मिलिंद चिबडे, प्रतीक मिसाळ, अँड. महेश आंबवले, सहचिटणीस पंकज पालकर, अविनाश आग्रे, बारकू बेंडल, खजिनदार पांडुरंग दोडेकर, संघ सहसचिव माधव कांबळे, महिला मंडळ अध्यक्ष दीपिका आग्रे, विवाह सल्लागार मंडळ अध्यक्ष सुरेश घडवले, कायदेविषयक प्रमुख रूपाली खळे, विविध तालुका अध्यक्ष, तालुका युवा अध्यक्ष, आजी- माजी पदाधिकारी, युवा कार्यकारिणी सदस्य प्रचारक आणि समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहचिटणीस पंकज पालकर यांनी केले. संविधान दिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून संविधानाने दिलेल्या मूल्यांचे आचरण करण्याचा, आपल्या हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवण्याचा आणि सामाजिक परिवर्तनासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस आहे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या कार्यक्रमात संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून संविधानिक मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प करण्यात आला. चला, संविधान समजून घेऊया, हक्क-अधिकार जाणून घेऊया आणि जागरूक, वैचारिक व जबाबदार नागरिक बनूया,
'चला जगण्याची दिशा बदलूया अशी शपथ
कुणबी युवा मुंबई
प्रचार प्रसार विभागातर्फे उपस्थितांना देण्यात आली.



