*नासा दौऱ्यावरुन परतलेल्या शिरवली शाळेच्या विधी धुर्येचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नासा दौऱ्यावरुन परतलेल्या शिरवली शाळेच्या विधी धुर्येचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत*
*नासा दौऱ्यावरुन परतलेल्या शिरवली शाळेच्या विधी धुर्येचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत*
लांजा(प्रतिनिधी):-अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था नासा व विविध संस्थांना भेटी देऊन माघारी परतलेली तालुक्यातील जि.प. शाळा शिरवली शाळेची विद्यार्थिनी कुमारी विधी विजय धुर्ये हिचे शिरवली गावात ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेने जाणू विज्ञान अनुभव विज्ञान या उपक्रमांतर्गत नासा व इस्रो भेट चाचणी परीक्षा असा Returns उपक्रम राबवला. या परीक्षेत लांजा तालुक्यातून टॉपर्सना नासा व इस्रो भेटीची संधी उपलब्ध करून दिली. लांजा तालुक्यातून जि.प.शाळा शिरवली शाळेची विद्यार्थिनी विधी विजय धुर्ये हिची निवड झाली होती. 12 नोव्हेंबर 26 ते 25 नोव्हेंबर 26 असा अभ्यास दौरा करून हे विद्यार्थी परत आले. विधी शिरवली गावात पोचल्यावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी तिचे औक्षण केले. तर गावकऱ्यांनी जंगी स्वागत करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी गावकऱ्यांकडून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करून पेढे वाटप केले. आदर्श विद्यामंदिर वाटूळ,हायस्कूल, जि. प. शाळा शिरवली येते तिचे स्वागत,अभिनंदन करण्यात आले. यानंतर विधीच्या घरी स्वागत समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी विधीला मार्गदर्शन करणारी शिक्षक केसरकर,सौ. दळवी, रानोटकर, मुख्याध्यापक गोतावडे उपस्थित होते.वाडीप्रमुख रमेश राजापकर, ग्रामस्थ रामचंद्र भानू राजापकर, अन्वर रखांगी, महेंद्र राजापकर संदीप सातोपे, संदीप सूद, दीपक मोडक, अनिल गोबरे, गोविंद सुद, दिनेश धुर्ये, देवेंद्र धुर्ये, सुरज धुर्ये व ग्रामपंचायत सदस्य सौ.अश्लेषा गोबरे, विठ्ठल जाधव, अंगणवाडी कर्मचारी सौ. रश्मी राजापकर, श्रीम. कुडकर, शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेडेगावातील मोलमजुरी करणाऱ्या पालकांच्या मुलांना अमेरिका दौऱ्याची संधी मिळाली याबद्दल विधीने जी.प. रत्नागिरी व मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक,आई-वडील यांचे आभार मानले. याप्रसंगी विधीने अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रातील एटीएक्स प्रशिक्षण सहभाग, अंतराळ स्थानकाची दुरुस्ती, ग्रहावरील खजिन्याचा शोध, अंतराळ यानातून प्रवास, अंतराळ प्रक्षेपण प्रणाली व नियंत्रण कक्षाची अनुभूती कथन केली. सन 2022- 23 पासून सुरु असलेल्या जि.प. रत्नागिरीच्या या उपक्रमात लांजा तालुक्यातून या शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी नासा, इस्रो व एक विध्यार्थीनी इस्रो निवड झाल्याबद्दल पालक वर्गातून सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचे कौतुक करण्यात आले.



